यंदा ३९ शाळांना टाळे

- प्रणय पाटील
मंगळवार, 24 जानेवारी 2017

जिल्हा परिषदेच्या २११ शाळांचे अस्तित्व धोक्‍यात 

जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्याबरोबरच पटसंख्यावाढीसाठी खास प्रयत्नांची गरज आहे...

अलिबाग - रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता ढासळली आहे. दरवर्षी पटसंख्येत घट होत आहे. त्यामुळे २०१६-१७ या चालू शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या ३९ प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. २११ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या शाळांमध्ये केवळ पहिली ते पाचवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे.

मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईत स्थलांतर होत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता ढासळल्याने पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांकडे आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या सातत्याने घटत आहे. चालू शैक्षणिक वर्षात (२०१६-१७) जिल्हा परिषदेच्या ३९ शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडल्या आहेत; तर २११ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या शाळा वाचवण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासोबत पटसंख्या वाढीसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व शिक्षा अभियान; तसेच इतर योजनांद्वारे शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. डिजिटल स्कूल ही संकल्पना राबवण्यात येत आहे. यासाठी सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांची मदतही घेण्यात येते; मात्र तरीही पटसंख्या घटत आहे.

अस्तित्व धोक्‍यात
एक विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळा     १९
दोन विद्यार्थी शिकत असलेल्या शाळा     ४९
तीन विद्यार्थी शिकत असलेल्या शाळा     ४८ 
चार विद्यार्थी शिकत असलेल्या शाळा     ५० 
पाच विद्यार्थी शिकत असलेल्या शाळा     ४५

Web Title: thirty nine school lock