डंपर चोरी प्रकरणः आंबोली पोलिसांकडून तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

आंबोली - डंपर चोरी प्रकरणी तिघांना आंबोली पोलिसांनी अटक केली. हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला असून डंपर चोरीत त्यांचा समावेश आहे का?याबाबतची  चौकशी सुरू आहे.

आंबोली - डंपर चोरी प्रकरणी तिघांना आंबोली पोलिसांनी अटक केली. हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला असून डंपर चोरीत त्यांचा समावेश आहे का?याबाबतची  चौकशी सुरू आहे.

सुभाष गंगाराम सावंत (राहणार ४८ दिवडि . ता माण. सातारा), अन्वर दाऊद दोसानि (६२), आसिफ रफीक पठाण (वय ३० दोघेही राहणार संभाजीनगर कोल्हापूर) या तिघांचा समावेश आहे. आंबोलीतील सुनिल नार्वेकर यांच्या मालकीचा तो डंपर होता. जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील डंपर चोरीप्रकरणी यांचा काही हात आहे का याचीही चौकशी सुरू आहे. आंबोलीतील पोलीस कॉन्स्टेबल गजानन देसाई, मायकल डिसोझा, सुनील नार्वेकर, उत्तम नार्वेकर, राजू राऊळ यांनी तपास मदतकार्यात सहभाग घेतला.

Web Title: three arrested in Damper Theft Case