सावधान ! मालवणात तीनजण कोरोना पॉझिटिव्ह 

Three Corona Positive Found In Malvan Sindhudurg Marathi News
Three Corona Positive Found In Malvan Sindhudurg Marathi News

मालवण ( सिंधुदुर्ग) - तालुक्‍यात आज तीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यात शहरातील दोन महिला तर देवली गावातील एका व्यक्तीचा समावेश आहे. 

येथील ग्रामीण रुग्णालयात आज 43 व्यक्तींची स्वॅब तपासणी करण्यात आली. एका व्यक्तीचे स्वॅब आरटीपीसीआर तपासणीसाठी ओरोस येथील लॅबमध्ये पाठवण्यात आले. 42 जणांची रॅपिड अँटीजन टेस्ट रुग्णालयात झाली. यात शहरातील एक ज्येष्ठ महिला पॉझिटिव्ह सापडली.

खासगी लॅबमध्ये तपासणी केलेल्या दोन व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील भरड येथील एक महिला तर देवली गावातील एका व्यक्तीच्या तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्‍यात आजपर्यंत 237 कोरोनाबाधित सापडले. त्यापैकी 144 रुग्ण बरे झाले.

5 व्यक्ती अन्य जिल्ह्यातून आलेले असल्याने ते आपल्या जिल्ह्यात उपचारासाठी गेले. येथील 3 व्यक्ती अन्य जिल्ह्यात उपचारासाठी गेले आहेत. सद्यस्थितीत 85 व्यक्तींवर मालवण व ओरोस याठिकाणी उपचार सुरू आहेत. यापैकी 12 व्यक्ती ओरोस कोविड हॉस्पिटल, 20 व्यक्ती कुंभारमाठ कोविड केअर सेंटर येथे तर 45 व्यक्तींवर घरी उपचार सुरू आहेत. काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com