वैभववाडीतील तीन पोलिसांनी अपघातात घडविले माणुसकीचे दर्शन 

एकनाथ पवार
बुधवार, 11 जुलै 2018

वैभववाडी - पोलिस म्हटलं एक ठरावीक प्रतिमा लोकांच्या डोळ्यासमोर येते. येथील पोलिस ठाण्यातील तिघा कर्मचाऱ्यांनी मात्र याला आपल्या मानवतवादी कृतीने छेद  दिला आहे.

वैभववाडी - पोलिस म्हटलं एक ठरावीक प्रतिमा लोकांच्या डोळ्यासमोर येते. येथील पोलिस ठाण्यातील तिघा कर्मचाऱ्यांनी मात्र याला आपल्या मानवतवादी कृतीने छेद  दिला आहे.

जनमानसाचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बऱ्याचदा नकारात्मक असतो. काही चुकीच्या गोष्टींमुळे पोलिस विभाग  बदनाम झाला आहे; परंतु काळ्याकुट्ट आभाळाला सोनेरी किनार असते, याचा प्रत्यय वैभववाडीवासियांना गेल्या दोन तीन घटनांमधून आला. यात येथील तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखविलेले प्रसंगावधान आणि कर्तव्यभावनेतून आला.  पंधरा वीस दिवसात तळेरे- कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गावर तीन भीषण अपघात झाले. तिन्ही अपघातामध्ये प्रवासी अडकून पडण्यामध्ये साम्य होते. कोकिसरे घंगाळा येथे आरामबस आणि मोटारीमध्ये अपघात झाला. यात मोटारीत चालक गंभीर अवस्थेत अडकून होता. एडगाव येथे अवजड ट्रक मोटारीवर कोसळला. त्यामध्येही मोटारचालक गाडीत अडकला होता. करूळ येथे आरामबस उलटून अपघात झाला होता. त्यात दोन महिला प्रवासी गाडीत विचित्र स्थितीत अडकल्या होत्या. पोलिसांनी या तिन्ही अपघातातील प्रवाशांना अतिशय कुशलतेने सहीसलामत बाहेत काढले. यामध्ये येथील पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक सचिन सापते, राजेंद्र खेडकर, गिरीश तळेकर या तिन कर्मचाऱ्यांनी केलेले काम वाखाण्याजोगे होते. गाडीत आपल्या घरचा कुणीतरी अडकलेला आहे अशा भावनेतून त्यांची धडपड सुरू होती. शेकडो बिनकामी लोकांना पांगवून काही काम करणाऱ्या तरूणांच्या मदतीने हे रेस्क्‍यु ऑपरेशन यशस्वी केले आणि एका तरूणांवर बेतलेले संकट दुर झाले. करूळ घाटातील बस अपघातात अडकलेल्या महिलांना पावसात गाडीच्या बाजूने मोठा खड्डा खणून बाहेर काढले. भुईबावडा घाटात पावसाने मधोमध आलेले दगड स्वतः रस्त्यावर उतरून दूर केले.

Web Title: Three Police show Humanity in accident