महाड, माणगाव मध्ये तीन पूल कमकुवत ; बांधकाम विभागाने लावले फलक

महाड
महाड

महाड : महाड व माणगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आखत्यारित येणारे महाड तालुक्यातील दादली व टोळ तसेच रायगड व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा आंबेत पूल हे महत्वाचे तीन पूल वाहतूकीला कमकुवत झाले आहेत. बारमाही पाण्याखाली असणा-या या पूलावरुन वाहतूक करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने सावधानता बाळगण्याचे फलक लावल्याने प्रवासी व वाहनचालक संभ्रमात पडले आहेत.

महाड जवळील सावित्री नदीवरील पूल 2 आँगस्ट 2016 ला कोसळून चाळीस जणांना जलसमाधी मिळाल्यानंतर पूलांच्या सुरक्षिततेबाबत सरकार खडबडून जागे झाले. राज्यातील सर्व पूलांचे स्ट्रकचरल आँडिट करण्याचे आदेश देण्यात आले. अनेकदा पूल वरुन चांगले असले तरी पाण्याखालील भागात खराब होण्याची शक्यता असते. यासाठी पूलाचे पाण्याखालील स्थितीचेही आँडिट करण्यात आले. महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील दादली पूल, काळ नदीवरील टोळ पूल व सावित्री नदी(खाडी) वरील आंबेत पूल यांचेही स्ट्रकचरल आँडिट करण्यात आले यात हे पूल पाण्याखाली सुस्थितीत नसल्याचा व दुरुस्ती करण्याचा निर्वाळा संबंधीत सर्व्हेक्षण करणा-या यंत्रणेने दिला आहे.

 बॅ. अंतुले यांनी आपल्या मंत्रीपदाच्या व मुख्यमंत्रीपदाच्या काळात रायगड जिल्ह्यातील या सर्व पूलांची कामे मार्गी लावली होती. 1980-82 या काळात हे पूल बांधण्यात आलेले आहेत. आंबेत पूल रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडतो. त्यावेळी मंडणगड, दापोली, खेड या तालुक्यातील प्रवाशांना महाडमार्गे मोठा वळसा घालून मुंबई, पुणे व इतर ठिकाणी जावे लागत होते. टोळ पूलामुळे आंबेत पूल मार्गे मंडणगड, दापोली, यांना मुंबई गोवा महामार्ग जवळचा झाला. तर दादली पूलामुळे महाडचा खाडीपट्टा व मंडणगड, दापोली, खेड तालुके जोडले गेले. तत्पूर्वी सर्व ठिकाणी जलवाहतूक होत होती. काळानुसार या पूलांवरुन रेती व इतर अवजड वाहन धावू लागल्याने पूल कमकुवत झाले आहेत. सावित्री घटनेनंतर पूलांबाबत प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण असते.सद्यास्थितीत बांधकाम विभागाने येथे सदर पूल कमकुवत झाले असुन 20 किमी वेगाने वाहने पूलावरुन नेण्याचे निर्देश फलक लावून दिले आहेत. या पूलावरुन अवजड वाहतूकही बंद केली जाणार आहे. तीनही पूल महत्वाचे पूल असल्याने त्यांची डागडूजी त्वरित करावी लागणार आहे.

अधिक्षक अभियंता( पूल विभाग) यांनी स्वतंत्रपणे या पूलांची पाहणी करुन त्यांच्या स्ट्रकचरल आँडिटचाही अभ्यास केला. त्यानंतर हे पूल कमकुवत असल्याचे निदर्शनास आल्याने येथे फलक लावले आहेत. वीस टन क्षमतेची वाहने व वीस पेक्षा अधिक वेग मर्यादा केले गेली आहे. पूलांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहे.
- बी.एन.बहिर ( कार्यकारी अभियंता,सा.बां.विभाग,महाड)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com