गणपतीपुळेत कर्नाटकातील तीन पर्यटकांना बुडताना वाचविले 

गणपतीपुळेत कर्नाटकातील तीन पर्यटकांना बुडताना वाचविले 

रत्नागिरी - गणपतीपुळेत देवदर्शनासाठी कर्नाटकातून आलेल्या पर्यटकांपैकी तिघांना समुद्रात बुडता - बुडता वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले. खवळलेल्या समुद्राचे पाणी पर्यकांना आत खेचत असल्याने बचाव कार्यात अडथळा येत होता. जीवरक्षकांनी त्यावर मात करीत रिंग, दोरी आणि बेटकी यांच्या मदतीने तिघांना सुखरुप बाहेर काढले.   

राघवेंद्र एम बंगोडी (वय 26, रा. बेळगाव-कर्नाटक), रफिक जालिहाळ (वय 26, रा. चिमणकट्टी), सतोष वायगोंलर (वय 21, रा. बेळगाव) अशी वाचविण्यात आलेल्या तीन पर्यटकांची नावे आहेत. आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास कर्नाटक येथून 25 जणांचा ग्रुप गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आला होता. यामधील तिघे समुद्रात पोहण्याचा मोह आवरू शकले नाहीत. जीवरक्षकांनी त्यांना पाण्यात उतरण्यासाठी शिटी मारून आगाऊ इशारा दिला होता. मात्र तो न जुमानता ते पाण्यात उतरले.

समुद्र खवळलेला होता. तिघे तिन्ही दिशेला गेले. जीवरक्षकांचे त्यांच्यावर लक्ष असल्याने मोठा अनर्थ टळला. समुद्राचे पाणी आत खेचत असल्याने त्यांना बाहेर येण्यास अडथळा येत होते. पोहून-पोहुन ते थकल्यामुळे गटांगळ्या खाऊ लागले. हे जीवरक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दोरी आणि रिंग त्यांना देण्याचा प्रयत्न केला. परंतु रिंग पकडता आली नाही. त्यामुळे धोका आणखी वाढला होता. एवढ्यात पाण्यात राईड करण्यासाठी गेलेल्या बेटकीच्या मदतीने तिघांनाही बाहेर काढले. जीवरक्षक आणि बेटकी चालकाच्या प्रसंगावधानामुळे तिघांचा जीव वाचला.

अनिकेत राजवाडकर, रोहित चव्हाण, अशिष माने, विक्रम राजवाडकर, अनेकत मयकर, विशाल निबंरे, ओंकार गावाणकर, मयुरेश देवरुखकर, अनेकत चव्हाण, उमेश म्हादये, अक्षय माने, प्रमोद डोर्लेकर या जीवरक्षकांनी मदत केली. मालगुंड पोलिस ठाण्याचे कर्मचारी सागर गोसावी, योगेश नाटुस्कर, होमगार्ड संदेश धावडे, रोहित निबंरे यावेळी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com