अवजड ट्रकने धडक दिल्याने तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या

अमित गवळे 
रविवार, 12 ऑगस्ट 2018

पाली (रायगड) : पाली खोपोली राष्ट्रिय महामार्गावर शनिवारी (ता.११) खुरावले फाट्याजवळ एक विचित्र अपघात झाला. मंद्यधूंद अवस्थेतील ट्रक चालकाने नशेमध्ये गाडी थांवाविण्यासाठी ब्रेक लावण्या ऐवजी ऐक्सलरेटर वर पाय दिला. यामूळे पुढे असलेल्या कारला जोरात धडक बसली. हि कार पुन्हा दुसर्या कारला धडकली अाणि हि दुसरी कार तिसर्या कारला धडकली अाणि तिसरी कार समोर उभ्या असलेल्या एसटीच्या पाठीमागील बाजूला धडकली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही मात्र मुका मार लागला.

हा अपघात प्रत्यक्ष पाहणार्यांनी ट्रक चालकाला गाडी बाहेर घेतले तेव्हा त्याला दारुचा वास येत होता. उभे सुद्धा राहता येत नव्हते. त्याने स्वतः यावेळेस मी दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे सर्वांच्या समोर कबूल केले. या अपघाताची खबर पाली पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे यांना तातडीने दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर थांबलेली रहदारी सुरळीत करण्यात आली.

पाली ते खोपोली राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदिकरणाचे काम सुरु आहे. एम एस आर डी ने टाकलेल्या माती व खडीच्या भरावामुळे पावसामुळे रस्त्यावर चिखल होत आहे. मूळ डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे हे वाहन चालकांना जिकीरीचे झाले अाहे.

Web Title: Three vehicles collided with each other due to bullets from a heavy truck