जिल्हाधिकाऱ्यांनी केला वाळूचा डंपरचा थरारक पाठलाग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

कुडाळ - जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी बेकायदा वाळू वाहतूक करणारा डंपर थरारक पाठलाग करीत पकडला. ही कारवाई उद्यमनगर येथे काल मध्यरात्री करण्यात आली. संबंधितांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने महसूलने तत्काळ पावले उचलली आहेत.

कुडाळ - जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी बेकायदा वाळू वाहतूक करणारा डंपर थरारक पाठलाग करीत पकडला. ही कारवाई उद्यमनगर येथे काल मध्यरात्री करण्यात आली. संबंधितांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने महसूलने तत्काळ पावले उचलली आहेत.

सिंधुदुर्गात गेले काही महिने वाळू लिलाव होत नसल्यामुळे चोरट्या वाळू वाहतुकीला ऊत आला आहे. महसूल विभागाकडून वेळोवेळी दंडात्मक करवाईही झालेली असून, तरीसुद्धा हा प्रकार सुरू आहे. आज मध्यरात्री चोरटी वाहतूक करणारा डंपर येत असल्याची कुणकुण महसूल विभागाला लागली. त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम कार्यरत केली. कुडाळ शहरातून एक डंपर हिंदू कॉलनीमार्गे संत राऊळ महाराज महाविद्यालयाकडून उत्तमनगरच्या दिशेने जात होता. त्याचा पाठलाग करत जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांनी डंपर उद्यमनगर येथे मुख्य रस्त्यावर अडवला.

डंपरची पाहणी केली असता त्यामध्ये वाळू असल्याचे स्पष्ट झाले. तोपर्यंत डंपरचालक पसार झाला होता. संबंधित डंपरमालक जवळील हॉटेलमध्ये लपल्याचे समजताच श्री. पांढरपट्टे यांनी आपली नजर तिकडे वळवली. ते येत असल्याचे समजतात एक एक व्यक्ती या गाडीतून पळून गेली, तर दुसरी सापडली. त्याला ताब्यात घेण्यात आले. वाळू वाहतुकीच्या पार्श्‍वभूमीवर पांढरपट्टे यांनी मध्यरात्री कुडाळसह गणेशमंदिर, पिंगुळी, गवळदेव परिसर आदी ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज केली होती. संबंधित डंपरचालकही आडवाटेने येण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतानाच जाळ्यात अडकला.

Web Title: The thrilling pursuit of the sand dumper in Kudal