तिबोटी खंड्या पक्षी आता परतीच्या प्रवासाला...

लक्ष्मण डुबे 
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

रायगड जिल्ह्यात ऋतु बदला नुसार वेगवेगळ्या जातीचे पाहुणे पक्षी येत असतात. मे महिन्यात शेवटी किंवा जुनच्या सुरवातीला तिबोटी खंड्या हे पक्षी कर्नाळा अभयारण्य, फणसाड अभयारण्य, कार्ले खिंड परीसरातील जंगलात येत असतात.

रसायनी (रायगड) - जिल्ह्यात पाहुणे आलेले सुंदर तिबोटी खंड्या पक्षी आता परतीच्या प्रवासाला लागला आहे. मुळ श्रीलंका, भुतान, कोंलबिया, मलेशिया आदी देशातून दोन अडीच महिन्यासाठी वास्तव्यास आलेले हे पाहुणे पक्षी ऑगस्ट मध्ये परत जातात, असे पक्षीप्रेमी विनायक डुकरे यांनी सांगितले. 

रायगड जिल्ह्यात ऋतु बदला नुसार वेगवेगळ्या जातीचे पाहुणे पक्षी येत असतात. मे महिन्यात शेवटी किंवा जुनच्या सुरवातीला तिबोटी खंड्या हे पक्षी कर्नाळा अभयारण्य, फणसाड अभयारण्य, कार्ले खिंड परीसरातील जंगलात येत असतात. दरडीत मातीत साधारण एक मीटर आत माती काढुन घरट बनवितात. जुलै मध्ये घरट्यात अंडी घालतात. तर मादी आळीपाळीने बसुन अंडी उबवतात, सतरा दिवसानंतर पिल्लं बाहेर पडतात. पिल्लं थोडी मोठी झाली की पुन्हा ऑगस्ट मध्ये हे पक्षी मायदेशी निघून जातात. या पक्षांचे पाल, खेकड, चोपई, कोळी हे भक्ष्य आहे, असे सांगण्यात आले. 

Tiboti Khandya

जंगलात आवाजा वरून या पक्षांचे बसले असल्याचे ठीकान शोधता येते. तर फोटो काढण्यासाठी तासन् तास दबा धरून बसावे लागते. तर कधी तीन चार दिवस फोटो टिपण्यासाठी जातात. प्रजननासाठी हे पक्षी अनुकूल वातावरण असणाऱ्या ठिकानी स्थलांतर करतात. - विनायक डुकरे, पक्षीप्रेमी, वासांबे मोहोपाडा 

Tiboti Khandya

Web Title: Tiboti Khandya birds are on a return journey