esakal | खवळलेल्या समुद्रामुळे मासेमारीचा शासकीय मुहूर्त टळणार 
sakal

बोलून बातमी शोधा

खवळलेल्या समुद्रामुळे मासेमारीचा शासकीय मुहूर्त टळणार 

रत्नागिरी - शासनाच्या आदेशानुसार पारंपरिक मच्छीमारीसाठीच्या बंदीचा कालावधी 1 ऑगस्टला संपुष्टात येत आहे; मात्र गटारी अमावास्येच्या तोंडावर वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला आहे. अजस्त्र लाटांच्या तांडवात नौका समुद्रात नेणे अशक्‍य आहे. त्यामुळे बंदी उठली तरीही मच्छीमारांना समुद्रात जाण्यासाठी पारंपरिक प्रथेप्रमाणे नारळी पौर्णिमेपर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

खवळलेल्या समुद्रामुळे मासेमारीचा शासकीय मुहूर्त टळणार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - शासनाच्या आदेशानुसार पारंपरिक मच्छीमारीसाठीच्या बंदीचा कालावधी 1 ऑगस्टला संपुष्टात येत आहे; मात्र गटारी अमावास्येच्या तोंडावर वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला आहे. अजस्त्र लाटांच्या तांडवात नौका समुद्रात नेणे अशक्‍य आहे. त्यामुळे बंदी उठली तरीही मच्छीमारांना समुद्रात जाण्यासाठी पारंपरिक प्रथेप्रमाणे नारळी पौर्णिमेपर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

पावसाळ्यात माशांचे प्रजनन हात असल्याने या काळात बिगर यांत्रिक किंवा यांत्रिक पद्धतीने मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात येते. या कालावधीत मच्छीमारी सुरू राहिली तर मत्स्योत्पादनावर परिणाम होऊ शकतो. सध्या मच्छीमारी व्यवसाय तोट्यात आहे. समुद्रात मासळीच मिळत नसल्याने मच्छीमार त्रस्त आहेत.

गतवर्षी मच्छीमारी बंदीच्या कालावधीत बदल करून केरळसह अन्य किनारपट्टी भागात 1 जून ते 31 जुलै मासेमारी बंदी लागू करण्यात आली. शासनाच्या आदेशाला मच्छीमारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. रत्नागिरी जिल्ह्यात मिरकरवाडा बंदरासह लहान आणि मध्यम अशी सुमारे 40 बंदरे आहेत. दोन महिन्याच्या कालावधीनंतर नव्या मासेमारी हंगामाची गुरुवारपासून सुरूवात होत आहे. मात्र जुलै महिन्यात पाऊस मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाला आहे. जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार ट्रॉलिंग बोटी आहेत. यामध्ये सर्वाधिक अडीच हजार नौका यांत्रिक असून उर्वरित नौका बिगर यांत्रिक आहेत. जूनमध्ये फार कमी प्रमाणात पाऊस कोसळला. जुलैमध्ये मात्र पावसाने धुमाकूळ घातल्याने मच्छीमारांनी हंगाम उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पर्ससिननेट मासेमारी 1 सप्टेंबरपासून 
पर्ससिननेट नौकांवरील निर्बंध 1 सप्टेंबरपासून शिथिल होणार आहेत. पर्ससिन बोटींना सशर्त मासेमारीची परवानगी देण्यात आली आहे. पर्ससिन बोटींचा मासेमारीचा हंगाम एक महिना उशिराने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीनंतर पंचवीस वाव अंतराबाहेर मासेमारी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. 
 
loading image