तिलारी कालव्यांची कामे निकृष्टच; परशुराम उपरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tilari canal works Demand for Inquiry Parashuram Upkar

तिलारी कालव्यांची कामे निकृष्टच; परशुराम उपरकर

सावंतवाडी : गेल्या वर्षभरात तीन ते चार वेळा कालवे फुटल्याच्या घटना घडल्या. यानंतर आता तिलारी कालवा विभागाकडून कालव्याची कामे नव्याने करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. म्हणजेच गेल्या पाच वर्षात झालेली कामे ही त्या वेळच्या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची केली असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे या कामांची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे मनसे नेते परशुराम उपरकर यांनी आज सांगितले. बांदा येथील सटमटवाडीतील कालवा हा टेस्टिंग वेळीच फुटला. त्यामुळे नवीन कालवे टिकतील का? असा प्रश्न देखील यांनी यावेळी उपस्थित केला.

श्री. उपरकर यांनी आज सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व तिलारी कालवा विभाग अधिकारी व प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. तिलारी अधिकारी रोहित कोरे आणि बांधकाम अधिकारी अनामिका चव्हाण यांची प्रथम भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी श्री. उपरकर म्हणाले, "संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली आह. डोंगरी विकास कामाच्या शासन निर्णयाप्रमाणे 10 लाख पर्यंतच्या कामाची यादी मागविली आहे. काही जुन्या कामांचा निधी द्यावयाचा होता हा निधी मधल्या कालावधीत आला होता तो मार्जितल्याच ठेकेदारांना देण्यात आला. कोणताही दंड न करता मुदतवाढ देण्यात आली.

अनेक कामे ही मर्जीतील ठेकेदारांना दिल्याच्या देखील माझ्याकडे तक्रार आहेत. याबाबत मी माहिती अधिकारात माहिती मागविणार आहे. काही रस्त्याच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत लवकरच माहितीच्या अधिकारात हे सर्व प्रकार उघड करू. रस्ता दर्जाबाबत अनेक तक्रारी आहेत. झालेल्या रस्त्यांचा दर्जा तपासणे गरजेचे असून त्याची टेस्ट करण्याची मागणी करू, नाहीतर आम्ही स्वतः स्व खर्चातून रस्त्याचे नमुने शासनमान्य खाजगी लॅबला पाठवून टेस्टिंग करणार आहोत." यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे, सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, उपतालुका अध्यक्ष प्रकाश साटेलकर, संतोष भैरवकर, बाबल गावडे, संदेश शेट्ये, सुंदर गावडे, आकाश परब, अभय देसाई, मंदार नाईक, नंदू परब, विष्णू वस्कर, विश्वनाथ राउळ आदी उपस्थित होते.

तिलारी कालवे कामांवर लक्ष

तिलारी कालव्यांची कामे नव्याने करण्याची इच्छा तेथील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे; मात्र नव्याने होणारी कामे चांगल्या पद्धतीने व्हावी, यादृष्टीने पाठपुरावा करणार असल्याचे श्री. उपरकर यांनी सांगितले.

Web Title: Tilari Canal Works Demand For Inquiry Parashuram Uparkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SindhudurgKokan