तिलोरी बोलीतले नऊ हजार शब्द संकलित

तिलोरी बोलीतले नऊ हजार शब्द संकलित

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी वस्ती अधिक असल्याने तिलोरी-कुणबी अर्थात संगमेश्‍वरी बोली जास्त प्रमाणात बोलली जायची. या बोलीतून अनेक कार्यक्रम करून देवरूखच्या आनंद बोंद्रे ही बोली जीवंत ठेवण्यासाठी योगदान देत आहेत. चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे अध्यक्ष अरुण इंगवले हेही या बोलीच्या जतनासाठी काम करीत आहेत. या बोलीतले सुमारे नऊ हजार शब्द, सुमारे ६० गाणी, काही म्हणी असे साहित्य त्यांनी संकलित केले आहे.

महाराष्ट्रातील बोलींच्या संवधर्नासाठी बाईट्‌स ऑफ इंडिया डॉट कॉमने (bytesofindia.com) पाऊल टाकले आहे. त्यानुसार चिपळूण, संगमेश्वरपासून अगदी राजापूरपर्यंतच्या भागात ही बोली बोलली जाते. मात्र, संगमेश्वरात प्रमाण जास्त असल्याने त्याला संगमेश्वरी नाव दिले गेले. सद्यस्थितीत इंग्रजीचा प्रभाव या बोलीवरही पडतोय. आनंद बोंद्रे, गिरीश बोंद्रे यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन सुनील बेंडखळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ हा संगमेश्वरी बोलीतला कार्यक्रम तीन वर्षांत लोकप्रिय केला.

१९०३ मध्ये जॉर्ज ग्रिअर्सनने केलेल्या भारताच्या भाषिक सर्वेक्षणात तिलोरी-कुणबी बोलणारे १३ लाख लोक होते. १९६१ मध्ये ही संख्या फारच घटली. तीनच जणांनी ती आपली मातृभाषा असल्याचे सांगितले होते.ही बोली बोलणे कमीपणाचे, अडाणीपणाचे, अशी भावना वाढीला लागली आहे. इंगवले यांच्या म्हणण्याप्रमाणे जतनासाठी आणखी प्रयत्नांची गरज आहे.

बोलींबद्दलची जागरूकता वाढतेय
मालवणी, वऱ्हाडी, अहिराणीसह अनेक बोलींची साहित्य संमेलने होत असून बोलींबद्दलची जागरूकता वाढत आहे. ग्रंथालयांनी स्थानिक साहित्यिक, बोली भाषांमधले लेखक यांच्यात चर्चा, संवाद असे कार्यक्रम करावेत. विविध बोलींमध्ये लेखन करणाऱ्या आम्ही मैत्रिणी एकमेकांना भेटून साहित्य वाचून दाखवतो, असे लेखिका रश्‍मी कशेळकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com