तंबाखूच्या व्यसनावर विद्यार्थ्यांच्या शब्दशस्त्राचा वार....

times weekly magazine in Z P primary school launching in tondavli oras kokan marathi news
times weekly magazine in Z P primary school launching in tondavli oras kokan marathi news

ओरोस (सिंधुदूर्ग) : ‘‘आणले मला पोर्तुगीजांनी भारतात.. सेवन केले मानवांनी, मानवाला देतो मी कॅन्सर, हिसकावून घेतो मी त्यांचे जीवन, ओळखा पाहू कोण मी?’’ असा काव्यमय प्रश्‍न विचारला आहे, तोंडवळी टाइम्स साप्ताहिकात. हे साप्ताहिक आहे मालवण तालुक्‍यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तोंडवळी वरची शाळेचे. या आठवड्याचे साप्ताहिक ‘तंबाखूमुक्ती विशेषांक’ या विषयावर आधारित १० फेब्रुवारीला प्रकाशित केले आहे.

जिल्हा परिषदेच्या तोंडवळी वरची शाळेतील मुलांनी २ जुलै २०१८ ला साप्ताहिक सुरू केले. दर आठवड्याच्या सोमवारी हे साप्ताहिक प्रकाशित करण्यात येते. १० फेब्रुवारीला या साप्ताहिकाचा ६७वा अंक प्रकाशित करण्यात आला. प्रशालेची विद्यार्थिनी मृणाली चव्हाण याची संपादक, सलोनी गोलतकर उपसंपादक असून आर्यन बागवे, दिव्या तोंडवळकर, आर्यन गोलतकर, दिया गोलतकर यांनी यासाठी लिखाण केले असून शिक्षक राजेश भिरवंडेकर प्रमुख मार्गदर्शक आहेत. शिक्षक परशुराम गुरव यांनी साप्ताहिक आकर्षक सेटअप केले आहे. मुख्याध्यापिका शीतल माडये, शिक्षक रूपेश दुधे, अशोक डोंगळ यांचे सहकार्य लाभले आहे.

६७ वा अंक
जिल्ह्यातील एकमेव तोंडवळी वरची शाळेतील मुले साप्ताहिक प्रकाशित करतात. त्यांनी प्रकाशित केलेला ६७ वा अंक तंबाखूमुक्तीसाठी प्राधान्य दिलेला आहे. संपादक मृणाली हिने लिहिलेला संपादकीय लेख ‘तंबाखूचे व्यसन टाळावे’ हा संदेश देणाऱ्या शीर्षकाखाली पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, जडणारे आजार याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. 

कविता खूपच मार्मिक
शाळेच्या विद्यार्थ्यांनी तंबाखूजन्य राक्षसाचे दहन प्रशालेच्या आवारात केले होते. त्याचे वृत्तांकन व दोन फोटो पहिल्या पानावर बातमी स्वरुपात ‘तोंडवळी वार्ताहर’ डेटलाइनखाली प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या साप्ताहिकात काव्य स्वरुपात लिखाण करण्यात आले आहे. यातील ‘ओळखा पाहू कोण मी?’ या शीर्षकाखालील कविता खूपच मार्मिक आहे. एकंदरीत हे साप्ताहिक वाचक व खास करून व्यसनी व्यक्तींना उद्‌बोधक आहे, हे निश्‍चित!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com