तिवरे धरणग्रस्तांच्या घरात अंधार ?

Electricity cut off in lasalgaon
Electricity cut off in lasalgaonesakal

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्यातील तिवरे धरण (Tiware Dam) फुटल्यानंतर तेथील बाधित कुटुंबांचे ताप्तुरते पुनर्वसन कंटेनरमध्ये केले होते. येथे वीजपुरवठ्यापोटी ६६ हजाराची रक्कम थकित होती. ती प्रशासनाकडून भरण्याचा निर्णय जिल्ह्याच्या दिशा समितीच्या बैठकीत झाला होता. दरम्यान, वीजबिल माफ(Electricity Bill) होणार असल्याने पुनर्वसन झालेल्या कुटुंबांनी खासदार तसेच राजकीय पुढाऱ्यांचा सत्कारही केला; मात्र गेल्या दोन महिन्यात थकित बिलाची रक्कम महावितरणकडे जमा झालेली नाही. त्याबाबतचे कसलेही पत्र महावितरणकडे पाठविलेले नाही. पुढाऱ्यांनी दिलेली आश्वासने हवेतच विरली असून बाधित कुटुंबीयांच्या घरात अंधार पडण्याचा धोका कायम आहे. (tiware-dam-electricity-bill-incident-case-kokan-marathi-news)

तालुक्यातील तिवरे धरणफुटीनंतर धरणाच्या पायथ्याशी असलेली भेंदवाडी जमीनदोस्त झाली. २२ जणांचे बळी गेले. त्यानंतर पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाली. बाधित कुटुंबीयांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाल्यावर काही जणांची निवास व्यवस्था कंटेनरमध्ये करण्यात आली. महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात आला; मात्र वीजबिल कोणी भरायचे यावरून थकित वीजबिल वाढत गेले. थकित बिलाची रक्कम जमा होत नसल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला होता. थकित बिल भरण्यास बाधित कुटुंबांनी नकार दिला. खासदार विनायक राऊत तिवरे येथे गेल्यानंतर थकित बिलाविषयी चर्चा झाली. वीजबिलाचा भार बाधित कुटुंबांवर पडणार नसल्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या दिशा समितीच्या बैठकीत तहसील कार्यालयाने वीजबिल भरण्याचा निर्णय झाला. तशा सूचनाही देण्यात आल्या. वीजबिलाची झळ बसणार नसल्याने बाधित कुटुंबीयांनी खासदार तसेच स्थानिक पुढारी व लोकप्रतिनिधींचे सत्कार केले.

वाडीत बिल माफ होणार असल्याची दवंडी पिटवण्यात आली. या घटनेला २ महिने झाले तरी थकित बिलाचा पत्ता नाही. ६६ हजाराची थकित बिले आता ७० हजारावर पोहोचले आहे. दिशा समितीने निर्णय घेतला असला तरी अद्याप बाधित कुटुंबांना थकित बिलाची दिशा मिळालेली नाही. पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे यांनी गेल्या मासिक सभेत आपल्या गणातील थकित बिलाचा मुद्दा मांडला होता. त्यावर बुधवारी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत महावितरणचे पालशेतकर यांनी सांगितले की, तिवरे येथील पुनर्वसन वसाहतीतील थकित बिलाची रक्कम महावितरणकडे जमा झालेली नाही. तसेच याविषयीचा पत्रव्यवहारही आमच्याकडे कोणी केलेला नाही. आता थकित बिलाची रक्कम ७० हजारावर पोहोचली आहे. त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांनी दिलेली आश्वासने हवेतच विरल्याचे दिसून आलेले आहे.

तिवरे धरणफुटीनंतर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात राजकारण झाले. ते अजूनही सुरूच आहे. वीजबिल प्रशासन भरणार असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली होती; मात्र तहसीलदारांच्या नावे असलेले ७० हजार ६०० रुपये थकित वीजबिल बुधवारीच महावितरणकडून ग्रामस्थांना मिळाले आहे. भर पावसाळ्यात बाधित कुटुबांच्या घरात पुन्हा अंधार नको.

- तानाजी चव्हाण, तिवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com