नारायण राणे अलिबाग न्यायालयात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारायण राणे अलिबाग न्यायालयात
नारायण राणे अलिबाग न्यायालयात

नारायण राणे अलिबाग न्यायालयात

sakal_logo
By

नारायण राणे न्यायालयात हजर
अलिबाग, ता. १ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवसेनेच्या वतीने दिलेल्या तक्रारींवरून महाडसह विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. महाड येथील दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात त्यांनी अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात हजेरी लावली. नारायण राणे गुरुवारी (ता. १) सकाळी १० वाजता अलिबाग न्यायालयासमोर उपस्थित राहिले. तसेच पुढील सुनावणीला गैरहजर राहण्यास परवानगी मिळावी यासाठी अर्ज सादर केला. त्यामध्ये ही केस खोटी असून ती निकाली काढावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मांडवा येथे फेरीबोटीने आलेल्या राणे यांच्या स्वागतासाठी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यकर्त्यांसमवेत ते न्यायालयात आले होते.