डॉ. प्रभाकर कोरे यांना अमेरिकेत जीवनगौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. प्रभाकर कोरे यांना अमेरिकेत जीवनगौरव
डॉ. प्रभाकर कोरे यांना अमेरिकेत जीवनगौरव

डॉ. प्रभाकर कोरे यांना अमेरिकेत जीवनगौरव

sakal_logo
By

फोटो ः 16291
न्यूयॉर्क ः केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित इंडो-अमेरिकन प्रेस क्लबच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी कॉन्सुलेट जनरल रणधीर जैस्वाल, न्यूयॉर्कचे माजी महापौर बिल दे ब्लासीओ न्यूयॉर्क शहर आर्थिक विकास मंडळाचे सदस्य प्याम क्वात्रा आदी.

डॉ. प्रभाकर कोरे यांना
अमेरिकेत जीवनगौरव
शिक्षण, आरोग्य सेवेची घेतली दखल
चिक्कोडी, ता. २३ : केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित इंडो-अमेरिकन प्रेस क्लबच्या वतीने ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. न्यूयॉर्क येथे शनिवारी (ता. २१) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उत्तर कर्नाटक व महाराष्ट्रात विशेष करून ग्रामीण भागात सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण आणि किफायतशीर आरोग्य सुविधा देत समाज आणि राष्ट्रनिर्माण कामात देत असलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
न्यूयॉर्कमध्ये असलेल्या भारतीय दूतावासात ‘प्रेस क्लब ऑफ यूएसए’ यांच्या वतीने हा कार्यक्रम झाला. येथील कॉन्सुलेट जनरल रणधीर जैस्वाल यांनी पुरस्कार प्रदान केला. न्यूयॉर्कचे माजी महापौर बिल दे ब्लासीओ आणि भारतीय उद्योजक व न्यूयॉर्क शहर आर्थिक विकास मंडळाचे सदस्य प्याम क्वात्रा या वेळी उपस्थित होते. झेविअर विद्यापीठाचे अध्यक्ष रविशंकर भोपळापूर, प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. दत्तात्रय नोरी, इंडो अमेरिकन प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष कमलेश मेहता आदी उपस्थित होते. डॉ. कोरे हे ग्रामीण भागापासून राजधानी दिल्ली ते परदेशातही शिक्षण संस्था सुरू करून लाखो मुलांना विद्यादानाचे काम करत आहेत. त्याच पद्धतीने आरोग्य क्षेत्रातही त्यांनी मोठी सेवा दिली आहे.
पुरस्काराबद्दल डॉ. प्रभाकर कोरे यांनी, ‘बेळगाव जिल्ह्यातील अंकली गावातून आपला सुरू झालेला प्रवास ते शेकडो संस्था यांची यशोगाथा सांगितली. तसेच या यशासाठी अनेकांचे सहकार्य मिळाल्याचे स्पष्ट केले.’

Web Title: Todays Latest Marathi News Blg22b11119 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top