शहांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नी आज बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहांच्या उपस्थितीत
सीमाप्रश्नी आज बैठक
शहांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नी आज बैठक

शहांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नी आज बैठक

sakal_logo
By

शहांच्या उपस्थितीत
सीमाप्रश्नी आज बैठक
महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
बेळगाव, ता. ७ : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाद विवादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्या (ता.८) दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सीमाप्रश्नाला चालना मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकात सीमा वादावरून तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व महाराष्ट्रातील इतर खासदारांनी याबाबत लोकसभेत बुधवारी आवाज उठविला होता. त्यानंतर श्री. शहा यांनी महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांची बैठक बोलविल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. उद्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.