बुद्धिबळ स्पर्धा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुद्धिबळ स्पर्धा..
बुद्धिबळ स्पर्धा..

बुद्धिबळ स्पर्धा..

sakal_logo
By

72188

राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा

मुंबईची आशना मखिजा आघाडीवर

पेट्रोलियम स्पोर्टस्‌ बोर्डची मेरी आना गोम्स द्वितीय स्थानावर

हातकणंगले, ता. ३० ः संजय घोडावत युनिव्हर्सिटी, अतिग्रे-रूकडी ता. हातकणंगले येथे चालू असलेल्या ४८ वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीनंतर मुंबईची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर आशना मखिजा पाच गुणांसह आघाडीवर आहे. पेट्रोलियम स्पोर्टस्‌ बोर्डाची आंतरराष्ट्रीय महिला ग्रँड मास्टर मेरी आना गोम्स साडेचार गुणांसह द्वितीय स्थानावर आहे.
अग्रमांनाकित महिला ग्रँडमास्टर दिल्लीची वंतिका अग्रवाल द्वितीय मानांकित गतविजेती नागपूरची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख, तृतीय मानांकित पेट्रोलियम स्पोर्टस्‌ बोर्डची आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामीनाथन, पाचवी मानांकित गोव्याची आंतरराष्ट्रीय मास्टर भक्ती कुलकर्णी, तमिळनाडूची आंतरराष्ट्रीय महिला ग्रँडमास्टर श्रीजा शेषाद्री, औरंगाबादची साक्षी चितलांगे, पश्‍चिम बंगालची ब्रिष्टी मुखर्जी, तमिळनाडूची व्ही. रिंधिया व तमिळनाडूची सी. संयुक्ता या नऊजणी चार गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.
स्पर्धेच्या पहिल्या पटावर चार गुणांसह आघाडीवर असणाऱ्या साक्षी चितलांगे व आशना मखिजा यांच्यातील लढतीत आशनाने ५७ व्या चालीला विजय संपादन करत पाच गुणांसह आघाडी घेतली. दुसऱ्या पटावर दिव्या देशमुख व वंतिका अग्रवाल यांच्यातील दीर्घकाळ चाललेली लढत ६३ व्या चालीअखेर बरोबरीत सुटली. तिसऱ्या पटावर मेरी आना गोम्स व विश्‍वा शहा यांच्यातील लढतीत विश्‍वाच्या उंटाच्या केलेल्या चुकीचा अचूक लाभ घेत मेरीने अवघ्या ३२ व्या चालीला विश्‍वाला डाव सोडण्यास भाग पाडले. किरण मोहंती व सौम्या स्वामीनाथन यांच्यातील लढतीत सौम्याने किरणला तिसाव्या चालीला डाव सोडण्यास भाग पाडले. सई पोटलुरी व भक्ती कुलकर्णी यांच्यातील सामन्यात भक्तीने आपल्या लौकिकास साजेसा तंत्रशुद्ध खेळ करत डावावर पूर्णपणे वर्चस्व राखत ५३ व्या चालीला विजय मिळवला. केरळच्या कल्याणी सीरिन हिने महिला आंतरराष्ट्रीय मास्टर तेजस्विनी सागर हिला अनपेक्षितरीत्या बरोबरीत रोखत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.