व्यापारी आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यापारी आत्महत्या
व्यापारी आत्महत्या

व्यापारी आत्महत्या

sakal_logo
By

फोटो - 4792
ओमप्रकाश शर्मा

इचलकरंजीत कापड व्यापाऱ्याची आत्महत्या
सातव्या मजल्यावरून उडी मारली; आर्थिक कारण असल्याचा संशय
इचलकरंजी, ता. २९ : खिशात देवघेणीच्या हिशेबाची सुसाईड नोट लिहून एका कापड व्यापाराने अपार्टमेंट इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ओमप्रकाश शंकरलाल शर्मा (वय ४२ रा. स्वामी अपार्टमेंट जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. शहरात कापड व्यापाऱ्यांच्या दिवाळीखोरीच्या घटना ताज्या असताना भरदिवसा या व्यापाऱ्याने अनोळख्या लोकवस्तीतील अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली. आर्थिक कारणातून आत्महत्या झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या घटनेची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओमप्रकाश शर्मा बोहरा मार्केटमध्ये एका फर्ममध्ये नोकरी करत होते. तसेच ते कापड व्यापारी असून, काही दिवसांपासून कापड खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते. शनिवारी (ता.२९) सकाळच्या सुमारास ते सांगली रोडवरील पाटीलमळा-नारायण मळा परिसरात असलेल्या प्रेमकमल रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये गेले होते. त्यानंतर ते अपार्टमेंटच्या गच्चीवर गेले. सातव्या मजल्याच्या गच्चीवर जाऊन खाली उडी मारली. इमारतीच्या खाली आसलेल्या मोपेडवर कोसळले. जमिनीवर जोराने आपटल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अचानक आवाज आल्याने अपार्टमेंटमधील नागरिक घटनास्थळी धावत आले, मात्र तोपर्यंत शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी गावभाग पोलिस धाव घेतली. नातेवाइकांनी व नागरिकांनी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलिसांना शर्मा यांच्या खिशात एक चिठ्ठी मिळून आली. त्यामध्ये त्यांनी कापड व्यवहारासह आर्थिक देवाण-घेवाणीबाबत नमूद केले आहे. तसेच चप्पल व मोबाईल सातव्या मजल्यावर पोलिसांना मिळून आले. मृताच्या नातेवाइकांकडे चौकशी करत मोबाईलची तपासणी केली. आर्थिक व्यवहाराची किनार असली तरी आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी दिली. घटनेचे नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली असून, याबाबतची फिर्याद विनोद किशनगोपाल शर्मा यांनी दिली.

चौकट
घटनास्थळ तपासाच्या केंद्रस्थानी
जवाहरनगरमध्ये राहण्यास असणाऱ्या शर्मा यांनी नारायणमळा परिसरात आत्महत्या केली. वास्तव्य असणारे ठिकाण आणि घटनास्थळ हे अंतर सुमारे ३ किलोमीटर आहे. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शर्मा अपार्टमेंटमध्ये आल्याची चर्चा घटनास्थळी होती आणि आत्महत्येची घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे घटनास्थळी अपार्टमेंटमधील नागरिकांची चौकशी पोलिस करत आहेत.