बांद्यात चित्रकला, निबंध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांद्यात चित्रकला, निबंध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
बांद्यात चित्रकला, निबंध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

बांद्यात चित्रकला, निबंध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

swt272.jpg
52894
बांदाः विजेत्या स्पर्धेकांसोबत उपस्थित मान्यवर.

बांद्यात चित्रकला, निबंध
स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
बांदा, ता. २६ः येथील नट वाचनालयाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शालेय स्तरावर आयोजित केलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर 1 येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
स्पर्धेचा गटवार अनुक्रमे निकाल असा आहे. पहिली ते चौथी गट चित्रकला स्पर्धा ः पहिली-भार्गव सावंत, स्वरा माजगावकर, तेजस कदम. दुसरी-तेजस्विनी कदम, शरण्या वायंगणकर, श्रेयस पाटील. तिसरी-काव्या चव्हाण, दुर्वा नाटेकर, तनिष्का देसाई.
चौथी-नील बांदेकर, गायत्री गवस, सर्वेक्षा ढेकळे. पाचवी ते सातवी गट निबंध स्पर्धा ः पाचवी- पूर्वा मोर्ये, नैतिक मोरजकर, अनुष्का झोरे. सहावी-शमिका केसरकर, मानसी सावंत, ऋतुजा बांदेकर. सातवी-ईश्वरी वावळीये, उर्वी बांदेकर, आर्या ठाकूर.
विजेत्या स्पर्धेकांना सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश पाणदरे, वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक जगन्नाथ सातोसकर, नीलेश मोरजकर, महाबळेश्वर सामंत, अंकुश माजगावकर, केंद्रप्रमुख संदीप गवस, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक, जे. डी. पाटील, अर्चना सावंत यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर, सुनील नातू, अमिता परब उपस्थित होते. सूत्रसंचालन जे. डी. पाटील यांनी केले. आभार राकेश केसरकर यांनी मानले.