
परप्रांतीयांच्या समस्यांवर कुडाळ मेळाव्यात चर्चा
52895
कुडाळ ः अमित त्रिपाठी यांचे स्वागत करताना युवा नेते आनंद शिरवलकर. सोबत रणजित देसाई, प्रभाकर सावंत, विनायक राणे आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
परप्रांतीयांच्या समस्यांवर
कुडाळ मेळाव्यात चर्चा
कुडाळ, ता. २७ ः भाजपतर्फे सेवा पंधरवड्यानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ अंतर्गत भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधून रोजीरोटीसाठी जिल्ह्यामध्ये कार्यरत गुजराती, मारवाडी, राजस्थानी, बिहारी लोकांसाठी मेळावा आयोजित केला होता. त्यामध्ये त्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे संयोजक, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद शिरवलकर यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश प्रवक्ता अमित त्रिपाठी, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, ‘प्रदेश’चे ऋषिकेश तिवारी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, ज्येष्ठ नेते राजू राऊळ, कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, महिला मोर्चा सरचिटणीस रेखा काणेकर, युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, पप्या तवटे, शहराध्यक्ष राकेश कांदे, भावजी यादव, नगरसेवक अॅड. राजीव कुडाळकर, सरचिटणीस देवेन सामंत, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, सरपंच नागेश आईर, उपसरपंच अमित दळवी, माजी नगरसेविका प्रज्ञा राणे, प्राची आठले, रेवती राणे, आनंद सूर्यवंशी, सिद्धांत बांदेकर आदी उपस्थित होते.