तलाव कठड्याची डागडुजी होईना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलाव कठड्याची डागडुजी होईना
तलाव कठड्याची डागडुजी होईना

तलाव कठड्याची डागडुजी होईना

sakal_logo
By

52935
सावंतवाडी ः मोती तलावाचा कोसळलेला कठडा. (छायाचित्र ः रुपेश हिराप)


तलाव कठड्याची डागडुजी होईना

स्थिती जैसे थे; दोन महिन्यांत मुहूर्तच नाही

सावंतवाडी, ता. २७ ः येथील मोती तलावाची संरक्षण भिंत कोसळल्यानंतर तब्बल दोन महीने उलटले; मात्र, संबंधित यंत्रणेकडून त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्षच केले आहे. खुद्द शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पालिका आणि बांधकाम प्रशासनाला सुचना देऊनही या कामाबाबत काहीच हालचाली दिसून येत नाहीत.
शहराची शान असलेल्या मोती तलावाची संरक्षण भिंत जुलैमध्ये तीन मुशी परिसरात कोसळली. एक- दोन दिवसाच्या फरकाने उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील फुटपाथही खचला होता. मुळात तलावातील गाळ काढण्याची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याने हा प्रकार घडला होता. एकूणच याबाबत मोती तलाव प्रेमींकडून आवाज उठविल्यानंतर संरक्षण भिंत उभारण्याबाबत हालचाली दिसून आल्या होत्या. एकूणच याबाबत लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने सुरवातीला प्रश्न उभा राहीला; मात्र, शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी यात लक्ष घातल्यानंतर आणि निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिल्यानंतर याबाबत पुन्हा एकदा नव्याने हालचाली झाल्या; परंतु, या गोष्टीला दोन महीने उलटले तरी या कामाला मुहूर्त मात्र सापडताना दिसत नाही. पालिका प्रशासनाकडून तर आता बांधकाम विभागाकडे बोट दाखविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे नेमके हे काम थांबले का? असा प्रश्न सर्वसामान्यातून उपस्थित केला जात आहे.
शहराला मोती तलावाने एक वेगळीच ओळख दिली आहे. या सुंदर अशा मोती तलावाच्या काठावर बसून अनेक जण आनंद घेत असतात. परंतु, या तलावाचा काठ कोसळत असताना त्याकडे दुर्लक्ष होणे, हे सावंतवाडीकर आणि मोती तलावप्रेमींच्या दृष्टीने दुःखदायक आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने तातडीने हे काम हाती घ्यावे.
----------
कोट
मोती तलावाच्या कोसळलेल्या संरक्षण कठड्यासंदर्भात टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली आहे. लवकरच याबाबत प्रक्रिया पूर्ण करून काम हाती घेतले जाणार आहे.
- अनामिका चव्हाण, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग