पित्रे महाविद्यालयात पं. दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पित्रे महाविद्यालयात पं. दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन
पित्रे महाविद्यालयात पं. दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

पित्रे महाविद्यालयात पं. दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

sakal_logo
By

rat26p2.jpg ः
52611
साडवलीः पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना उपप्राचार्य डॉ. पाटील, पर्यवेक्षक प्रा. लुंगसे.
------
पंडित उपाध्याय यांना अभिवादन
साडवलीः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी प्रतिमापूजन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी पर्यवेक्षक प्रा. लुंगसे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. सीमा कोरे, प्रा. संदीप मुळ्ये, प्रा. स्वप्नाली झेपले उपस्थित होते. डॉ. सरदार पाटील म्हणाले, उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ आणि तात्विक ग्रंथाच्या चिंतनातून त्यांनी एकात्म मानवतावादाचा सिद्धांत भारतीय समाजापुढे मांडले.
---------
rat26p7.jpg
52616
साखरपाः कार्यशाळेत माहिती देताना अधिकारी.
------------
साखरपा येथे आधार लिंक कार्यशाळा
साखरपाः येथील आबासाहेब सावंत कला आणि वाणिज्य महाविद्यालयात एक कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत पीकपाणी नोंदणी आणि आधार लिंक याची माहिती देण्यात आली. या वेळी साखरपा गावाचे तलाठी पवार यांनी मोबाईलवर पीकपाणी विषय कसा हाताळावा याची माहिती दिली. त्यासाठी आवश्यक अ‍ॅप कोणते, त्याच्यावर खात्याची नोंदणी कशी करावी आणि ते अ‍ॅप कसे हाताळावे याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पुर्ये गावाच्या तलाठी कांबळे यांनी आधारकार्डला आपला मोबाईल कसा लिंक करावा याचे प्रात्यक्षिक दाखवत सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेला कोंडगाव तलाठी मुरकुटे, वांझोळे तलाठी शिंदे उपस्थित होते.
--------
rat26p8.jpg
52617
साखरपाः पाककला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक.
----------
साखरपा केंद्रशाळेत पाककला, वेशभूषा स्पर्धा
साखरपा ः साखरपा नं. १ या केंद्रशाळेत पाककला आणि वेशभूषा स्पर्धा झाली. शालेय पोषण सप्ताहानिमित्त या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या केंद्रशाळेत शालेय पोषण सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्त माता पालकांसाठी पाककला स्पर्धा आयोजित केली होती. पाककृती स्पर्धेचे परीक्षण हर्षा आठल्ये आणि जोगळेकर यांनी केले. रानभाजा प्रकारात प्रीती पावसकर यांनी प्रथम तर अपूर्वा केळकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. पारंपरिक पदार्थ प्रकारात संचिता जोयशी यांनी प्रथम, स्वाती चव्हाण आणि मानसी लिंगायत यांनी द्वितीय तर अपूर्वा मीठबावकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण भजनावळे आणि सहदेव पाटील यांनी केले. केंद्रप्रमुख रामचंद्र कुवळेकर, पूर्वा अभ्यंकर, संदीप जोयशी, विनायक शिंदे, अनुष्का शिंदे हे उपस्थित होते.
--------------