560 कोटीपैकी किती प्रकल्प शक्य याचा आढावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

560 कोटीपैकी किती प्रकल्प शक्य याचा आढावा
560 कोटीपैकी किती प्रकल्प शक्य याचा आढावा

560 कोटीपैकी किती प्रकल्प शक्य याचा आढावा

sakal_logo
By

rat२७p११.jpg
५२८६८
रत्नागिरीः जागतिक पर्यटनदिनानिमित्त रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था व जिल्हा प्रशासन आयोजित महोत्सवात बोलताना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील. डावीकडून विद्या कुलकर्णी, रमेश कीर, संजय यादवराव, सॅमसन डिसिल्वा. (मकरंद पटवर्धन ः सकाळ छायाचित्रसेवा)

पर्यटनाचा ५६० कोटींचा आराखडा
पालकमंत्री उदय सामंत; किती प्रकल्प आणणे शक्य याचा घेतला आढावा
त्नागिरी, ता. २७ ःजिल्ह्याच्या पर्यटनाचा ५६० कोटीचा आराखडा केला आहे; पण त्यातले किती प्रकल्प आणू शकलो, याचा आढावा घेईन. पर्यटनाबाबतची मंत्रालयात सभा घ्यायची असेल ती घेऊ. जिल्हा पर्यटन नकाशावर आहेच; परंतु त्यापेक्षा पुढे जाऊन जिल्हा जागतिक पातळीवर पोहोचण्याकरिता पर्यटनासाठी निधी देण्याची पालकमंत्री म्हणून तयारी आहे. सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊया,असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यानी केले.
रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था आणि जिल्हा प्रशासन, पर्यटन संचालनालय यांच्या माध्यमातून जागतिक पर्यटनदिनाचे औचित्य साधून अल्पबचत सभागृहात आयोजित पर्यटन महोत्सवात ते बोलत होते. परिषदेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आंबा, काजू, फणस, मांसाहारी जेवणाची पद्धत सातासमुद्रापार गेली पाहिजे आणि पर्यटक आपल्याकडे आला पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे. पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील म्हणाले, जिल्ह्यात सह्याद्री, कातळ आणि समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटन होते. खाडी पर्यटन, साहसी खेळ आणि कृषी पर्यटनही सुरू आहे. आपण स्वतः तयारी दाखवली पाहिजे. स्थानिक टीमने पुढाकार घेतला पाहिजे. सोन्यासारख्या निसर्गसौंदर्याची किंमत लोकांना दाखवता आली पाहिजे. हे प्रयत्न सांघिक पद्धतीने केले पाहिजेत. खाडी पर्यटन व अन्य प्रकारातील पर्यटनासाठी ४०० प्रकारचे प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे आले आहेत. पर्यटकांना सोयीसुविधा मिळाल्या आणि नैसर्गिकरित्या पर्यटनाचा आनंद घेता आला तरच ते शाश्वत पर्यटन राहिल याकडे लक्ष दिले पाहिजे.
जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी प्रदीप सिंग, संजय यादवराव, इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, महेश सानप, वीरेंद्र सावंत, सॅमसन डिसिल्वा, मंगेश कोयंडे, पर्यटन विभागाचे माळी, युयुत्सु आर्ते, नवनिर्माण शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये आणि पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर आदी उपस्थित होते.

rat२७p१३.jpg-
52870
रमेश कीर

रमेश कीर म्हणाले की, पर्यटन संस्कृती रुजवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. गोव्यात गेल्यावर पर्यटनाचा जो अनुभव येतो ते पर्यटन. पर्यटकांचे गोव्यात पैसे खर्च झाले पाहिजेत त्या पद्धतीने ते वागतात. ते आपल्याला आपल्यात रुजवायला हवे. पर्यटकांशी आपण कसे वागतो त्याचा विचार करा. पर्यटक नेहमी बरोबरच असतो हा हॉटेल इंडस्ट्रिजचा नियम आहे. पर्यटनानुकूल परिस्थिती निर्माण केल्याशिवाय पर्यटन वाढणार नाही.
- रमेश कीर

------------------------------
rat२७p१४.jpg
52871
डॉ. श्रीधर ठाकूर

ब्रॅंड रत्नागिरी एमएच ८ नेमका काय आहे याकरिता मूल्यमापन केले पाहिजे. प्रत्येक तालुक्यासाठी पर्यटन समन्वयक नेमण्याची गरज आहे. पर्यटन उद्योगासाठी मूलभूत गोष्टी म्हणजे नम्रता, सौजन्य, अगत्यशीलता आणि जबाबदारी घेण्याची तयारी लागले. सोयीसुविधा बघून पर्यटक येतात. महामार्ग पूर्ण झाल्यावर पर्यटकांचा ओघ येईल; पण त्यांना सेवा देणारे व पैसे मिळवणारे बाहेरचे असतील हे ध्यानी घ्या. ५० लाख लोक मुंबईतून रस्त्याने गोव्याला जातात. कशेडी ते राजापूर या १९० किमी महामार्गावरून जायला साडेचार तास लागतात. तो मध्येच थांबतो व हजार रुपये तरी खर्च करतो; पण महामार्गावरील हॉटेल्स आणि सुविधा किती आहेत, याचा विचार केला पाहिजे.
- डॉ. श्रीधर ठाकूर