फोंडाघाट महाविद्यालयात एनएसएस सप्ताहाला प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोंडाघाट महाविद्यालयात 
एनएसएस सप्ताहाला प्रारंभ
फोंडाघाट महाविद्यालयात एनएसएस सप्ताहाला प्रारंभ

फोंडाघाट महाविद्यालयात एनएसएस सप्ताहाला प्रारंभ

sakal_logo
By

52948
फोंडाघाट ः येथील महाविद्यालयात ई- पीक पाहणी कार्यक्रमात बोलताना संदेश सावंत.

फोंडाघाट महाविद्यालयात
एनएसएस सप्ताहाला प्रारंभ
फोंडाघाट,ता. २७ ः येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात एनएसएस सप्ताहाचे निमित्ताने विविध कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन केले असून त्याचे उद्‍घाटन फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुभाष सावंत यांच्या हस्ते झाले.
एनएसएस विभाग व कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ई - पीक पाहणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सांगवे मंडल अधिकारी दिलीप पाटील यांनी ‘ई - पीक पाहणी’चे महत्त्व स्पष्ट केले.
यावेळी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे संचालक संदेश सावंत यांनी पालकांची व आपल्या गावातील इतर शेतकऱ्यांची ई -पीक पाहणी करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कणकवली पंचायत समितीच्या माजी सभापती सुजाता हळदिवे- राणे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दुसऱ्या सत्रात प्रशिक्षक बाजीराव काशीद यांनी विद्यार्थ्यांना ई - पीक पाहणी ॲपची माहिती दिली. फोंडाघाट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले, फोंडाघाट मंडल अधिकारी नीलिमा प्रभुदेसाई, फोंडाघाट तलाठी अरुणा जयानवार आदी उपस्थित होते. एनएसएस विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संतोष आखाडे यांनी आभार मानले.