भरणे येथे राज्य पंच कब्बड्डी परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरणे येथे राज्य पंच कब्बड्डी परीक्षा
भरणे येथे राज्य पंच कब्बड्डी परीक्षा

भरणे येथे राज्य पंच कब्बड्डी परीक्षा

sakal_logo
By

rat२७p६.jpg
५२८३५
खेडः भरणे येथे राज्य पंच कब्बड्डी परीक्षेनिमित्त आलेल्या मान्यवरांचा सन्मान करताना चिकणे.

भरणे येथे राज्य पंच कब्बड्डी परीक्षा
खेड ः महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय पंच परीक्षा नुकतीच रत्नागिरी जिल्हा कबड्डी असो. मार्गदर्शनानुसार खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्यावतीने कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवभारत हायस्कूल भरणे येथे पार पडली. या स्पर्धेसाठी राज्य असोसिएशनच्यावतीने नियुक्त राज्य पर्यवेक्षक भरत मुळे राष्ट्रीय पंच व सहसेक्रेटरी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांची तर खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे सचिव रवींद्र बैकर यांची केंद्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या परीक्षा केंद्रावर चिपळूण-१२, गुहागर -०२ व खेड -१५ अशा एकूण २९ पात्र जिल्हा पंचांनी परीक्षा दिली. खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्यावतीने सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा देऊन परीक्षेची सुरवात झाली. यानंतर लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा नियोजनाप्रमाणे पार पडली. समारोपप्रसंगी खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश चिकणे, चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे मुख्य कार्यवाह विलास गुजर, राष्ट्रीय कोच संतोष शिर्के यांच्यासह खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष दाजी राजगुरू, शरद भोसले, दिलीप कारेकर, सुभाष आंबेडे उपस्थित होते. सूत्रसंचालन सहसचिव शरद भोसले यांनी केले. आभार सुभाष आंबेडकर यांनी मानले.
---
rat२७p७.jpg
52836
खेडः कोकण विभागीय स्तरावर घेण्यात आलेल्या तायक्वांदो स्पर्धेत यशस्वी आयसीएस महाविद्यालयातील विद्यार्थिनींसोबत प्राचार्य डॉ. एच. पी. थोरात सोबत प्रशिक्षक.

तायक्वांदोत ‘आयसीएस’ सुवर्णपदक
खेडः मुंबई विद्यापीठाअंतर्गत कोकण विभागीय स्तरावर घेण्यात आलेल्या तायक्वांदो स्पर्धेत येथील सहजीवन शिक्षणसंस्थेच्या आयसीएस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील हर्षदा पार्टे हिने सुवर्ण तर सोहम हुमणे याने रौप्य पदक प्राप्त केले आहे. कोकण विभागीय स्तरावरील या स्पर्धा २१ सप्टेंबरला गोगटे-जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे आयोजित केल्या होत्या. दोन्ही स्पर्धकांची २९ व ३० सप्टेंबर २०१२ ला खालसा कॉलेज माटुंगा, मुंबई येथे होणाऱ्या विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दोन्ही स्पर्धकांना क्रीडाप्रशिक्षक प्रशांत कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सहजीवन शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष हिराचंद बुटाला, मंगेश बुटाला, नंदकुमार गुजराथी, चेअरमन अॅड. आनंदराव भोसले, डॉ. थोरात, डॉ यादव यांनी अभिनंदन केले.
---
rat२७p८.jpg
52837
खेडः शहरात जड्याळवाडी येथील अंगणवाडीतर्फे काढण्यात आलेल्या पोषण रॅलीमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी, पालक, अंगणवाडी सेविका व मदतनीस.

चिमुकल्यांकडून पोषण आहाराबाबत जनजागृती
खेडः शहरातील जड्याळवाडी येथील अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या ३० बालकांनी पालकांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. २६) परिसरात प्रभातफेरी काढून पोषण आहाराबाबत जनजागृती केली. खेड शहरातील जड्याळवाडी येथील अंगणवाडीच्या सेविका दर्शना क्षीरसागर व मदतनीस दीप्ती शिगवण यांनी सोमवारी सकाळी ११ वा. परिसरात पोषण आहार रॅलीचे नियोजन केले होते. अंगणवाडीमधील ३० बालके त्यांचे पालक व नागरिक यांच्या सहकार्याने या रॅलीत सहभागी झाले होते. तीन ते चार वयोगटातील चिमुकल्यांनी या वेळी हातात फलक घेऊन आपल्या पालकांचा हात धरून पोषण आहाराबाबत जनजागृती केली. जड्याळवाडी येथील अंगणवाडी ते प्रबोधनकार ठाकरे उद्यानपर्यंत ही पोषण रॅली काढण्यात आली.
----------------
rat२७p९.jpg
52838
सानिका जाधव

सानिका जाधव उत्कृष्ट अभिनेत्री
खेडः मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने विद्यापीठाची ५५वी सांस्कृतिक युवा महोत्सवामधील एकांकिका नाट्य प्रकारची अंतिम फेरी नॅशनल कॉलेज, बांद्रा या ठिकाणी पार पडली. या फेरीमध्ये तु. बा. कदम महाविद्यालयाची सानिका जाधव हिचा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मान केला आहे. तत्पूर्वी ज्ञानदीप महाविद्यालय, मोरवंडे-बोरज येथे झालेल्या आंतरमहाविद्यालय निवड फेरीमध्ये एकांकिका या कलाप्रकारात महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता. विद्यापीठ युवक महोत्सवाची अंतिम फेरी नॅशनल कॉलेज, बांद्रा येथे पार पडली. येणाऱ्या काळामध्ये सानिका हिला विविध व्यावसायिक नाट्य किंवा मालिकांमध्ये काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात सिनेनाट्यसृष्टीमध्ये सानिका चमकली तर नवल नाही. महाविद्यालयाच्यादृष्टीने हे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल. तिने विद्यापीठ युवामहोत्सवात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल संस्था सचिव अॅड. तु. ल. डफळे यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
-------
rat२७p४.jpg
52833
साडवलीः रोहन बने, समीक्षा बने व सुरेश बने यांच्याकडून देवीला ५१ ग्रॅम सोन्याचा हार अर्पण.

सह्याद्रीनगरच्या देवीला हार अर्पण
साडवली ः येथील सह्याद्रीनगर मित्रमंडळातर्फे नवरात्रोत्सव घटस्थापनेपासून सुरू झाला. सोमवारी दुपारी माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, समीक्षा बने व माजी जि. प. सदस्य सुरेश बने यांनी नवसपूर्ती करताना देवीला ५१ ग्रॅमचा सोन्याचा हार अर्पण केला. भव्य मिरवणुकीने देवीची मूर्ती आणून विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पहिल्याच दिवशी भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. या उत्सवातील देवी नवसाला पावते, अशी श्रद्धा असून भाविक हे नवस मनोभावे फेडत असतात. या वेळी मंडळाचे अध्यक्ष सुखदेव जाधव, संगीता जाधव व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
-------