रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

गोगटे महाविद्यालयाचे
वक्तृत्व स्पर्धेत यश
रत्नागिरी ः पटवर्धन हायस्कूल येथे आयोजित गुरूवर्य अच्युतराव पटवर्धन स्मृती वक्ता दशसहस्रेषु या वक्तृत्व स्पर्धेमध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने यश मिळवले. महाविद्यालयाच्या मनस्वी नाटेकर आणि सिद्धी सार्दळ यांनी सहभाग घेतला. प्रथम वर्ष कला शाखेत शिकणाऱ्या मनस्वीने ''परीक्षा अशी हवी’ हा विषय मांडला आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला. द्वितीय वर्ष कलाशाखेत शिकणाऱ्या सिद्धीने ''वाढती प्रसारमाध्यमे आणि मी'' या विषयावर बोलून उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. वक्तृत्व व वादविवाद समितीचे समन्वयक प्रा. जयंत अभ्यंकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले.प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
------------

कुवारबाव ब्राह्मण सभेतर्फे
रविवारी महालक्ष्मीपूजन
रत्नागिरी ः कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे आश्विन शुद्ध सप्तमी शके १९४४ म्हणजे येत्या रविवारी (ता. २) श्री महालक्ष्मी पूजन व जागर उत्सवाचे आयोजन केले आहे. हा उत्सव किशोर नवाथे यांच्या एमआयडीसी परिसरातील निवासस्थानी होणार आहे. सर्व भाविकांनी सायंकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत महालक्ष्मी जागरामध्ये सहभागी होऊन प्रसादाचा लाभ घ्यावा. महालक्ष्मी पूजनाचा वसा पूजन करू इच्छिणाऱ्या सुवासिनींनी रानडे, जोशी, मुळ्ये यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष अनंत आगाशे यांनी केले आहे.