रत्नागिरी ः अष्टपैलू शिक्षक नरेंद्र पाटील सेवानिवृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः अष्टपैलू शिक्षक नरेंद्र पाटील सेवानिवृत्त
रत्नागिरी ः अष्टपैलू शिक्षक नरेंद्र पाटील सेवानिवृत्त

रत्नागिरी ः अष्टपैलू शिक्षक नरेंद्र पाटील सेवानिवृत्त

sakal_logo
By

rat२७p२६.jpg- KOP२२L५२९६८ रत्नागिरी- गोदुताई जांभेकर विद्यालयात नरेंद्र पाटील यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रमात त्यांना शुभेच्छा देताना शिल्पा पटवर्धन, सतीश शेवडे सोबत सुधाश्री पाटील आदी.
-------------

गोदूबाई जांभेकर विद्यालयात
नरेंद्र पाटील यांचा सत्कार
रत्नागिरी, ता. २९ ः रत्नागिरीतील शिक्षणक्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तीमत्व ज्येष्ठ क्रीडाशिक्षक नरेंद्र पाटील हे गोदुताई जांभेकर विद्यालयाच्या ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. शुभेच्छा कार्यक्रमात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, मुख्याध्यापिका गायत्री गुळवणी, प्रभारी मुख्याध्यापक अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.
गोदुताई जांभेकर विद्यालयाने माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यामुळेच इतकी वर्ष यशस्वीपणे सेवा करू शकलो. या शाळेने मला जी ओळख दिली ती माझ्या आयुष्यभराची कामाची पोचपावती आहे. आजचा हा सेवानिवृत्तीचाही दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला असल्याचे पाटील यांनी सांगितले. नरेंद्र पाटील यांनी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीलाही त्यांच्या कार्याने एक वेगळी ओळख दिली आहे. त्यांचे काम कौतुकास्पद ठरले आहे. त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे उद्गार शिल्पा पटवर्धन यांनी काढले.