कणकवलीत ‘संविधान बचाओ’ पदयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत ‘संविधान बचाओ’ पदयात्रा
कणकवलीत ‘संविधान बचाओ’ पदयात्रा

कणकवलीत ‘संविधान बचाओ’ पदयात्रा

sakal_logo
By

52998
कणकवली : येथील संविधान बचाओ पदयात्रेत सहभागी आमदार वैभव नाईक यांच्यासह इतर.

कणकवलीत ‘संविधान बचाओ’ पदयात्रा

आमदार वैभव नाईकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग

कणकवली, ता.२७ : ‘नफरत छोडो, संविधान बचाओ’ अभियानांतर्गत आज कणकवलीत ‘संविधान बचाओ’ पदयात्रा काढण्यात आली. यात आमदार वैभव नाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले.
शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौकात या यात्रेचा प्रारंभ झाला. त्यानंतर ही पदयात्रा शहरातून गोपुरीच्या दिशेने रवाना झाली. यात्रेदरम्यान संविधानप्रेमींनी बुद्धविहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला व गोपुरी आश्रमातील कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमात संविधानप्रेमींनी ‘नफरत छोडो, संविधान बचाओ’, ‘संविधान एक परिभाषा है, संविधान एक अशा है’ आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
या पदयात्रेत लेखक नितीन साळुंके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा बँकेचे संचालक व नगरसेवक सुशांत नाईक, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाथ मुसळे, चित्रकार नामानंद मोडक, अभिनेता नीलेश पवार, सुंगधा साटम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, महेश तेली, माजी जिल्‍हा परिषद सदस्य नागेश मोरये, विनायक मेस्त्री, अॅड. मनोज रावराणे, विजय सावंत, रामू विखाळे, रुपेश आमडोसकर, निसार शेख, सचिन आचरेकर, प्रशांत वनसकर, महानंदा चव्हाण, संजय राणे, विनायक सापळे, सचिन चव्हाण, मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते. लेखक नितीन साळुंके म्हणाले, ‘‘देशात महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून दैनंदिन गरजा भागवून पोट कसे भरायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मात्र, महागाईच्या मुद्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तसेच देशात दोन व्यक्तींच्या कंपनीचे सरकार असून याविरोधात संविधानिक आयुधांचा वापर करून जनतेने आता रस्त्यावर उतरायला हवे.’’ अॅड. मनोज रावराणे, ईशाद शेख, नीलेश पवार यांनीही आपले विचार मांडत संविधानाचे महत्त्व विशद केले. यावेळी नामानंद मोडक यांनी भगतसिंग यांनी लिहिलेले पत्र यावेळी वाचून दाखविले.