राजापूर ः शिक्षण हेच प्रभावी अस्त्र, अफवांवर विश्वास ठेवू नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः शिक्षण हेच प्रभावी अस्त्र, अफवांवर विश्वास ठेवू नका
राजापूर ः शिक्षण हेच प्रभावी अस्त्र, अफवांवर विश्वास ठेवू नका

राजापूर ः शिक्षण हेच प्रभावी अस्त्र, अफवांवर विश्वास ठेवू नका

sakal_logo
By

rat२७p२९.jpg-२२L५२९९६ राजापूर ः राजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गरजू विद्यार्थ्यांना पोलिसदलातर्फे मोफत सायकल वाटप करण्यात आले.
---------------

अफवांवर विश्वास ठेवून शिक्षण थांबवू नका
डॉ. मोहितकुमार गर्ग ; राजापूर पोलिसांकडून ५२ विद्यार्थ्यांना सायकल
राजापूर, ता. २७ ः गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुले पळवणाऱ्या टोळीसंदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे पालकांच्या मनात उद्भवणारी भिती कमी करण्यासाठी सर्व पोलिस ठाणेनिहाय जनगाजृती सुरू आहे. मुलांसाठी शिक्षण हेच प्रभावी अस्त्र असून अफवांमुळे मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू देऊ नका. पोलिस यंत्रणा कायदा सुव्यवस्था राखण्यास सक्षम आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाणे-येणे सोपे व्हावे यासाठी नाटे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गरजू आणि दुर्गम भागातील ५२ विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दिली.
सोशल मीडियावर अफवांबाबक पालकांच्या मनातील भिती कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही जिल्ह्यात जनजागृती सुरू केली आहे. मुलांचे शिक्षण महत्वाचे असून त्या प्रवाहात ते राहावेत, निर्धास्त ते शाळेत जावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नाटे पोलिस ठाणे हद्दीमधील दुर्गम, अतिदुर्गम भागात असणाऱ्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप कार्यक्रम केला. जेणेकरून दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहचणे व वेळेवर घरी येणे सुलभ होईल. राजापूर व नाटे पोलिसांनी ८ शाळेतील २७ मुले व २५ मुली अशा एकूण ५२ विद्यार्थ्यांना सीएसआरच्या निधीतून मोफत सायकल वितरण करण्यात आल्या आहेत.
मुलांसाठी शिक्षण हेच प्रभावी अस्त्र आहे. अधिक मदतीसाठी ११२ वर संपर्क केल्यास जलद प्रतिसाद मिळतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे आयोजन लांजा उपविभागीय पोलिस अधिकारी निवास साळोखे, जनार्दन परबकर, राजापूर पोलिस निरीक्षक आबासो पाटील उपस्थित होते.