रत्नागिरी ः जिल्ह्यातील 2, 76000 गुरांचे करणार लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः जिल्ह्यातील 2, 76000  गुरांचे करणार लसीकरण
रत्नागिरी ः जिल्ह्यातील 2, 76000 गुरांचे करणार लसीकरण

रत्नागिरी ः जिल्ह्यातील 2, 76000 गुरांचे करणार लसीकरण

sakal_logo
By

जिल्ह्यात २ .७६ लाख गुरांचे करणार लसीकरण

मुंबईहूनही एक पथक दाखल; कडक उपाययोजनांवर भर
रत्नागिरी, ता. २७ ः मांडवे (ता. खेड) येथे एका गुराला लम्पी स्किन आजाराची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजनांवर भर दिला आहे. आठवडाभरात लागण झाल्याची शंका असलेल्या पाच किलोमीटर परिसरातील १८ हजार ६०० गुरांचे तत्काळ लसीकरण करण्यात आले आहे. महिन्याभरात जिल्ह्यातील २ लाख ७६ हजार गुरांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.
खेड तालुक्यातील मांडवे परिसरात बैलाला लम्पीसदृश लक्षणे दिसली होती. त्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाने तपासणीसाठी पुणे येथे पाठवला होता. तो लम्पी पॉझिटिव्ह आढळून आल्याने पशुसंवर्धन विभाग अधिक सतर्क झाला आहे. मांडवे पंचक्रोशीतील ५ कि. मी. परिसरातील तळे, जैतापूरवाडी, कोसंबीवाडी परिसरातील गुरांचे लसीकरण केले जात आहे. जिल्हा परिषदेचे ७३ व राज्याचे ८० असे एकूण १५७ पशू दवाखान्यांच्या अखत्यारित यंत्रणेमार्फत कार्यवाही हाती घेण्यात आलेली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक टप्प्यात आतापर्यंत ३५ हजार लसींचे डोस गुरांसाठी पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध झालेले आहेत. जिल्ह्यात २ लाख ७६ हजार पाळीव गुरे आहेत. या सर्व पाळीव गुरांना लम्पी स्किनच्या पार्श्वभूमीवर मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या मदतीला मुंबईहूनही एक पथक दाखल झालेले आहे. त्या पथकात पशुसंवर्धन विभागातील ८ प्रशिक्षणार्थी व २ प्राध्यापकांचा समावेश आहे. हे पथक गुहागर व रत्नागिरी येथे कार्यरत राहणार आहेत.

चौकट
तपासणी नाक्यांवर तत्काळ चौकशी
पशुपालक शेतकरी परजिल्ह्यातून संकरित तसेच चांगल्या जातीची जनावरे घेऊन येतात. लम्पी स्किनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परजिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात आणल्या जाणाऱ्या गायी-म्हशींना पशुसंवर्धन विभागाने बंदी घातलेली आहे. अशा जनावरांची जर जिल्ह्यात वाहतूक होत असेल तर जिल्ह्याच्या सीमेवरील तपासणी नाक्यांवर तत्काळ चौकशी केली जावी, असे निर्देश जिल्हा प्रशासन व पोलिस विभागामार्फत देण्यात आलेले आहेत.