पर्य़टक व्यावसायिकांनी ''एक खिडकी''त सहभागी व्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्य़टक व्यावसायिकांनी ''एक खिडकी''त सहभागी व्हा
पर्य़टक व्यावसायिकांनी ''एक खिडकी''त सहभागी व्हा

पर्य़टक व्यावसायिकांनी ''एक खिडकी''त सहभागी व्हा

sakal_logo
By

पर्यटक व्यावसायिकांनी
‘एक खिडकी’त सहभागी व्हा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ः बंदर विभागाने केलेल्या आवाहनानुसार बंदर जेटी येथे १ ऑक्टोबरपासून एक खिडकी माध्यमातून स्कुबा डायविंग सुरू केले जाणार आहे. मालवणातील सर्व व्यावसायिकांनी या एक खिडकीत सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन व्यवसायिक दामोदर तोडणकर यांनी केले आहे.
बंदर जेटी येथील निवासस्थानी तोडणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘किनारपट्टीवर पर्यटन हंगाम बहरत असताना अधिकृत, अनधिकृत यावरून होणारे वाद तसेच एखाद्या व्यवसायिकास टार्गेट करणे ही भूमिका चुकीची आहे. येथील पर्यटन वाढावे हाच प्रमुख हेतू असून त्यासाठी जर एक समान दर निश्चिती होऊन एक खिडकी होण्यासाठी बंदर विभाग पुढाकार घेत असेल तर ते स्वागतार्ह आहे. मात्र, किनारपट्टीवर एक दर व एकच खिडकी असावी व ती बंदर जेटी येथेच असावे हिच आपली भूमिका आहे. त्याच उद्देशाने १ ऑक्टोबरपासून एक खिडकी व एक दर स्कुबा डायव्हिंग सुरु केले जाणार आहेत. वॉटर स्पोर्ट्स व पॅरासिलिंग व्यवसायिक एकत्र येत असतील तर त्यांचेही स्वागत आहे. बंदर विभागाने निश्चित केलेले दर यानुसारच जलक्रीडा व्यवसाय सुरु केले जाणार आहेत. यापूर्वीही एक खिडकीसाठी प्रयत्न झाले. मात्र, ते बंद झाले. आता काही कडक नियम बंदर विभागाने घालून दिले आहेत. त्याचेही स्वागत आहे. अनधिकृत म्हणून जर कोणी आरोप करत असतील तर गप्प बसणार नाही. माझ्या नव्या बोटींनाही बंदर विभागाकडून नंबर प्राप्त झाले आहेत. अन्य प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. अशा स्थितीत माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी यापूर्वी मी ज्यांना जो व्यवसाय दिला, त्याचे आत्मचिंतन करावे.’’