
रत्नागिरी-रत्नागिरीत पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन
rat२७p३१.jpg-
KOP२२L५३०१७ रत्नागिरी ः उद्घाटनप्रसंगी तिन्ही परीक्षक, कलोपासकचे विश्वस्त प्रदीप पाटसकर, कलाकार व रत्नागिरी कलोपासकचे कार्यकर्ते उपस्थित.
रत्नागिरीत पुरुषोत्तम करंडकचे उद्घाटन
आज बक्षीस वितरण ; तरूणाईच्या अभिनयाचा कस
रत्नागिरी, ता. २७ ः अभिनयक्षेत्रात नावाजलेली आणि स्पर्धेच्या माध्यमातून अभिनयाला पैलू पाडणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे रत्नागिरी केंद्रावर आज स्वा. सावरकर नाट्यगृहात नटराज पूजनाने झाले. आज एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाने ‘कोपरा’ आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने ‘कुपान’ या एकांकिका सादर केल्या. स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्या (ता. २८) दुपारी २ वाजता असून प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनावेळी परीक्षक विनयराज उपरकर, प्रदीप तेंडुलकर, गिरीश केमकर, महाराष्ट्रीय कलोपासकचे विश्वस्त प्रदीप पाटसकर, प्रा. अडसुळ, डॉ. संजय केतकर, नाटककार अनिल दांडेकर, गौरी फणसे, श्रुती नित्सुरे, संदीप जोशी, असाद मोरे व अजिंक्य केसरकर आणि उपस्थित होते. सूत्रसंचालन तेजा मुळ्ये यांनी केले.
सायंकाळी संत राऊळ महाराज महाविद्यालयाची २६ जुलै, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाची एच २ एसओ ४ आणि डीबीजे महाविद्यालयाची बिराड एकांकिका सादर झाली. आज डीबीजे महाविद्यालय चिपळूण यांची ''जहाज फुटलं आहे'', ही एकांकिका सादर होऊ शकली नाही.