तोरसेत माय लेकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोरसेत माय लेकाचा मृत्यू
तोरसेत माय लेकाचा मृत्यू

तोरसेत माय लेकाचा मृत्यू

sakal_logo
By

तोरसेत माय-लेकाचा मृत्यू
मोटार-कंटेनर धडक; तिघांची प्रकृती गंभीर
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २७ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तोरसे (पेडणे-गोवा) येथे आज दुपारी मोटार व मासळीवाहू कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात पुणे येथील गुंडेशा कुटुंबातील महिला व तिच्या एक वर्षाचा चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. मोटारीतील अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना बांबोळी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, रस्त्याच्या दुरवस्थेमुळेच अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
पुणे येथील पियूष गुंडेशा पत्नी अपूर्वा (वय ३२), दीड वर्षाचा मुलगा, सात वर्षांची मुलगी व घरकाम करणाऱ्या महिलेसह मोटारी (एमएच १२ टीएस ८७८०) तून गोव्यात पर्यटनासाठी जात होते. मुंबईच्या दिशेने मासळी वाहतूक करणारा कंटेनर (केएल १० - एझेड ८०९६) ने मोटारीला समोरासमोर जोरदार टक्कर दिली. अपघातात मोटारीचा चेंदामेंदा झाला. यामध्ये आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या आवाजाने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मोटारीत गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या घरकाम करणाऱ्या महिलेला पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पेडणे व मोपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तोर्से येथे महामार्गाचे काम गेले बरेच महिने रेंगाळले आहे. रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याने तेथे सतत अपघात होत आहेत.

महामार्गाचे काम रेंगाळल्याने अपघातांत वाढ झालेली आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने येथील वाहतूक जुन्या रस्त्याने वळविण्यात आली आहे; पण नवख्या वाहनचालकांच्या हे लक्षात येत नाही. त्यातच पुढून येणाऱ्या वाहनामुळे आणखी गोंधळ उडतो व वळण घेऊन वाहने दुसऱ्या रस्त्यावर जाताना तेथे सतत अपघातग्रस्त होतात.

53073
तोरसे : येथे मंगळवारी दुपारी झालेल्या अपघातातील चक्काचूर झालेली मोटार.
53072
अपघातातील कंटेनर.