लसीकरणासोबत विमा धोरणही राबवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरणासोबत विमा धोरणही राबवा
लसीकरणासोबत विमा धोरणही राबवा

लसीकरणासोबत विमा धोरणही राबवा

sakal_logo
By

swt2813.jpg
53157
विश्वनाथ नाईक

लसीकरणासोबत विमा धोरणही राबवा
विश्वनाथ नाईकः ‘लम्पी’बाबत प्रशासनाचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २९ः लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धनमार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहेत; परंतु काही गाभण जनावरांच्या पशुपालकांमध्ये लसीकरणाबाबत भीतीचे वातावरण आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाने याबाबत जागृती करून पशुपालकांची भीती दूर करावी. तसेच लसीकरणासोबत जनावरांचे विमा धोरण एकत्रित राबविण्याची मागणी पाडलोस सहकारी सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी प्रशासनाकडे केली आहे.
सिंधुदुर्गात ‘लम्पी’चा शिरकाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम पशुसंवर्धन विभागाने सुरू केली आहे. पशुपालकांचा लसीकरणास कोणताही विरोध नसून गाभण जनावरांची चिंता सतावत आहे. गावात शेतकरी वर्गातील पशुपालकांकडे आठ ते पंधरा जनावरे असून सर्वांचा विमा उतरविणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने लसीकरणासोबत जनावरांचा एकत्रित विमा उतरविण्याची मागणी नाईक यांनी केली आहे. पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. सर्पदंश होऊन मृत पावलेल्या जनावरांची प्रशासनाकडून कोणतीही भरपाई मिळत नाही. आर्थिक परिस्थितीत हलाखीची असल्याने शेतकऱ्यास जनावरांचा विमा उतरविणे शक्य होत नाही. त्यामुळे लसीकरणासोबत विमा धोरण व जनावरांच्या सशक्तीकरणावरही भर देण्याची मागणी व्हाईस चेअरमन नाईक यांनी केली आहे.
..............
कोट
आतापर्यंत लसीकरण केलेल्या गाभण जनावरांना त्रास झालेला नाही. त्यामुळे लसीकरण निर्धोक आहे. जनावरांबाबत विमा योजना सद्यस्थितीत नाही. पशुपालकांनी वैयक्तिक स्वरुपात जनावरांचा विमा उतरवावा.
- विद्यानंद देसाई, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.
------------