पावणाई खारबंधाऱ्याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावणाई खारबंधाऱ्याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास उपोषण
पावणाई खारबंधाऱ्याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास उपोषण

पावणाई खारबंधाऱ्याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास उपोषण

sakal_logo
By

पावणाई खारबंधाऱ्याबाबत ठोस
कार्यवाही न झाल्यास उपोषण
पप्पू लाड ः उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २८ः अनेक वर्षांची मागणी राहिलेल्या तालुक्यातील पावणाई गावातील खारबंधारा होण्याच्या मागणीचे निवेदन पावणाई सरपंच पप्पू लाड यांनी तळेरे (ता. कणकवली) येथील खारभूमी सर्वेक्षण आणि अन्वेषण विभागाच्या उपविभागीय अधिकार्‍यांना दिले आहे. वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधून याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास नाईलाजास्तव ग्रामस्थांसमवेत उपोषण करावे लागेल, इशाराही त्यांनी दिला आहे.
पावणाई गावातील खारबंधारा होण्याची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वारंवार मागणी केली जात होती. यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही अपेक्षित हालचाली दिसत नसल्याने सरपंच लाड यांनी खारभूमी विभागाच्या उपविभागीय अधिकारी यांना निवेदन पाठवून त्यांचे लक्ष वेधले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत पावणाई कार्यक्षेत्रामध्ये पावणाई खारभूमी योजनेमधून खार बंधारा बांधणे या कामाचा प्रस्ताव मंजुरीसाठी खारभूमी कार्यालयाकडे सादर केला होता. खारभूमी विभागाकडे वारंवार पत्र व्यवहार व फोनद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा केला; मात्र या विषयाबाबत खारभूमी कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. तसेच काम होण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही केल्याचे आढळून येत नाही. परिणामी कार्यालयाला या विषयाचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. येत्या आठ दिवसांत पावणाई खारभूमी योजनेमधून खार बंधारा बांधणे या कामाबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थांसहीत नाईलाजास्तव उपोषणाचा मार्ग पत्करावा लागणार आहे, असा इशारा दिला आहे.