गोगटे-वाळके महाविद्यालय प्राचार्यपदी डॉ. काजरेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोगटे-वाळके महाविद्यालय
प्राचार्यपदी डॉ. काजरेकर
गोगटे-वाळके महाविद्यालय प्राचार्यपदी डॉ. काजरेकर

गोगटे-वाळके महाविद्यालय प्राचार्यपदी डॉ. काजरेकर

sakal_logo
By

53362
पानवळ ः प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांचे अभिनंदन करताना डी. बी. वारंग. शेजारी संस्थेचे पदाधिकारी.

गोगटे-वाळके महाविद्यालय
प्राचार्यपदी डॉ. काजरेकर
बांदा, ता. २९ : येथील गोगटे-वाळके महाविद्यालय, बांदाच्या प्राचार्यपदी डॉ. गोविंद काजरेकर यांची नियमित प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली. डॉ. काजरेकर याच महाविद्यालयात गेली २७ वर्षे मराठी विषयाचे अध्यापन करत असून ते मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात मराठी विषयात पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य व शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर लेखक, संपादक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
डॉ. काजरेकर हे महाराष्ट्रातील नामवंत कवी व समीक्षक असून त्यांच्या साहित्य निर्मितीला उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कारासह एकूण चार राज्यस्तरीय पुरस्कार लाभले आहेत. मागील तीन वर्षे गोगटे-वाळके महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत होते. आता त्यांची विद्यापीठ व शासन नियुक्त समितीमार्फत निवड होऊन त्यांना प्राचार्यपदी नेमण्यात आले. त्याविषयी त्यांना विद्यापीठाच्या मान्यतेनुसार संस्थाध्यक्ष डी. बी. वारंग यांनी अधिकृत पत्र दिले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ बांदा संस्थचे उपाध्यक्ष प्रमोद कामत, सचिव एस. आर. सावंत, खजिनदार टी. एन. शेटकर, सहसचिव डी. एस. पणशीकर, सदस्य सुभाष मोर्ये, मंदार कल्याणकर, प्रेमानंद नाडकर्णी, शीतल राऊळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.