‘महिला-बाल विकास’चे कार्य कौतुकास्पद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘महिला-बाल विकास’चे कार्य कौतुकास्पद
‘महिला-बाल विकास’चे कार्य कौतुकास्पद

‘महिला-बाल विकास’चे कार्य कौतुकास्पद

sakal_logo
By

swt2914.jpg
53363
सिंधुदुर्गनगरीः लाभार्थ्यांना सीईओ प्रजित नायर यांच्या हस्ते निवडपत्रे देण्यात आली.

‘महिला-बाल विकास’चे कार्य कौतुकास्पद
प्रजित नायरः सिंधुदुर्गनगरीत लाभार्थ्यांना निवडपत्र प्रदान
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २८ः ‘राष्ट्रनेता ते राष्टपिता सेवा पंधरवडा’ उपक्रमात महिला व बाल विकास विभागाने गतिमान पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करून चांगले यश मिळविले. दुर्गम भागातून आलेल्या लाभार्थ्यांना निवडपत्र देताना मनापासून आनंद होत आहे, अशा शब्दांत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी विभागाचा गौरव केला.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महिला व बाल विकास विभागाकडील योजनेचा लाभ मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना निवडपत्र वितरण करण्यात आले. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना चावीचे तसेच मंजुरीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, मुख्य वित्त व लेखाधिकारी वल्लरी गावडे, कृषी विकास अधिकारी सुधीर चव्हाण, पशुसंवर्धन अधिकारी विद्यानंद देसाई उपस्थित होते.
महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले यांनी सुरुवातीला सर्वांचे स्वागत करून योजना आणि लाभार्थी यांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ वैयक्तिक वस्तू लाभाची योजना तसेच योजनेचे प्रशिक्षण पूर्ण झालेले लाभार्थी असे या आठवड्यात २३५ जणांना लाभ दिले आहेत. सेवा पंधरवडा आणि सद्याच्या नवरात्रोत्सवात लाभार्थ्यांसाठी योजनांचा उत्सव ठरतोय. लाभार्थ्यांनी स्वतःच्या उत्पन्नवाढीसाठी याचा उपयोग करावा. उर्वरित लाभार्थ्यांनाही त्यांचे लाभ लवकरच दिले जातील.’’
यावेळी किराणा, कुक्कुट पालन, शेळी पालन, संगणक प्रशिक्षण, शिलाई मशिन, सायकल, घर घंटी, विद्युत पंप, पोर्टेबल स्प्रेपंप, ग्रास कटर याबाबत लाभार्थ्यांना निवडपत्र देण्यात आले. या कार्यक्रमात कृषी, पशुसंवर्धन, समाज कल्याण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाकंडील विविध योजनांच्या पात्र लाभार्थींना आज मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांच्या हस्ते निवडपत्र दिले. कणकवलीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल पाटील यांनी आभार मानले. संध्या मोरे यांनी सूत्रसंचालन केले.