अन्वी गावकर ‘सुदृढ बालक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अन्वी गावकर ‘सुदृढ बालक’
अन्वी गावकर ‘सुदृढ बालक’

अन्वी गावकर ‘सुदृढ बालक’

sakal_logo
By

53358
सावंतवाडी ः अन्वी गावकरचा सत्कार करताना फुलचंद मेंगडे.

अन्वी गावकर ‘सुदृढ बालक’
सावंतवाडी ः एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत घेण्यात आलेल्या सुदृढ बालक स्पर्धेत माजगावची अन्वी गावकर तालुक्यात प्रथम आली. आज तिचे सावंतवाडी पोलिसांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले. यावेळी सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती यादव, एकात्मिक बालविकास प्रकल्पच्या अधिकारी संध्या मोरे, अंगणवाडी सेविका रुतिका निब्रे आदी उपस्थित होते. तालुक्यातील २४८ अंगणवाड्यांमध्ये ही स्पर्धा झाली.
................
53365
राज ठाकरे

राज ठाकरे लवकरच कोकणात
कुडाळ ः विदर्भ दौऱ्यानंतर आता राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर येणार आहेत. येत्या ७ ऑक्टोबरपासून त्यांच्या ‘मिशन कोकण’ला सुरुवात होण्याची शक्यता आहे. ठाकरे यांचा हा दौरा सहा दिवसांचा असणार आहे. ते कोल्हापुरातून तळकोकणात दाखल होणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात प्रत्येकी दोन दिवस त्यांचा दौरा असणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातील मनसे सैनिकांमध्ये उत्साह आहे. दौऱ्यात मनसे कार्यकर्त्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिली.