सर्वसामान्यांच्या हितासाठी ''सेवा पंधरवडा'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वसामान्यांच्या हितासाठी ''सेवा पंधरवडा''
सर्वसामान्यांच्या हितासाठी ''सेवा पंधरवडा''

सर्वसामान्यांच्या हितासाठी ''सेवा पंधरवडा''

sakal_logo
By

swt2919.jpg
53387
मुळदेः ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना दाखले वितरण प्रसंगी तहसीलदार अमोल पाठक, गुरुनाथ चव्हाण, अमित पालव, रामदास चव्हाण, गीता कोरगावकर, गोविंद तोरसकर आदी. (छायाचित्रः अजय सावंत)

सर्वसामान्यांच्या हितासाठी ‘सेवा पंधरवडा’
अमोल फाटकः मुळदेत लाभार्थ्यांना रेशन कार्ड, दाखले वाटप
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २९ः शासनाच्या विविध योजना तळागाळात पोहोचून त्यांचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा, यासाठी सेवा पंधरवडा हा उपक्रम राबविण्यात आला आहे, असे प्रतिपादन तहसीलदार अमोल फाटक यांनी मुळदे येथे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ कार्यक्रमात बुधवारी (ता. २८) केले.
या उपक्रमांतर्गत मुळदे गावातील लाभार्थ्यांना रेशन कार्ड तसेच उत्पन्नाचे दाखले वितरणाचा कार्यक्रम साबाजी पालव यांच्या निवासस्थानी तहसीलदार पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सुरुवातीला पाठक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुळदे ग्रामपंचायत व तंटामुक्त गाव मुळदे यांच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना पाठक म्हणाले, ‘‘गावातील लोकांचे उत्पन्न दाखले तसेच इतर दाखले त्यांना तत्काळ मिळावेत, याबाबत जागृतीसाठी तसेच शासनाच्या विविध योजना तळागाळात पोचून त्यांचा लाभ प्रत्येकाला मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ''राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा'' या अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्यासाठी ही विशेष मोहीम आहे. सद्यस्थितीत पाच ते सहा गावांसाठी एकच तलाठी असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, हे निश्चितच आम्हाला माहीत आहे. यापुढे ग्रामस्थांना तलाठ्यांच्या माध्यमातून सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्यात येईल.’’
यावेळी २६ लाभार्थ्यांना दाखल्यांचे वितरण करण्यात आले. शिधापत्रिकेतील नाव कमी करण्यासह अन्य सुविधा पात्र लाभार्थ्यांना या मोहिमेंतर्गत देण्यात आल्या. यावेळी सरपंच गुरुनाथ चव्हाण, उपसरपंच अमित पालव, पोलिस पाटील रामदास चव्हाण, माजी सरपंच संजय पालव, मुळदे तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवाजी पालव, पोलिस पाटील रामदास चव्हाण, तलाठी गीता कोरगावकर, ग्रामसेवक गोविंद तोरसकर, ग्रामपंचायत सदस्य भिवा पालव, दर्शन नारकर, संध्या मुळदेकर, चारुशिला पाताडे, श्रद्धा पालव, गुणवंती म्हापणकर उपस्थित होते. सरपंच चव्हाण यांनी गावातील ग्रामस्थांसाठी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यासाठी तलाठी कोरगावकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने आभार मानले. सूत्रसंचालन पोलिस पाटील रामदास चव्हाण यांनी केले. स्वागत सरपंच चव्हाण यांनी केले.