उद्योगासाठी ‘भाजप कामगार’तर्फे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योगासाठी ‘भाजप कामगार’तर्फे निवेदन
उद्योगासाठी ‘भाजप कामगार’तर्फे निवेदन

उद्योगासाठी ‘भाजप कामगार’तर्फे निवेदन

sakal_logo
By

rat२९p१.jpg-
५३२८६
रत्नागिरी ः उद्योगांसंबंधित मागण्यांचे निवेदन उद्योगमंत्री उदय सामंत यांना देताना भाजप कामगार आघाडीचे दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भडकमकर, संतोष बोरकर. सोबत प्राची नागवेकर, अमर कीर, उदय गोवळकर.

उद्योगासाठी ‘भाजप कामगार’तर्फे निवेदन
रत्नागिरीः रत्नागिरीतील बंद उद्योग पुन्हा सुरू करणे, रत्नागिरीमध्ये नवीन उद्योग आणण्याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांना भाजप कामगार आघाडीच्या दक्षिण रत्नागिरी शाखेतर्फे निवेदन देण्यात आले. रत्नागिरी एमआयडीसीमधील बरेचसे उद्योग बंदावस्थेत आहेत. ते पुन्हा सुरू झाल्यास रत्नागिरीतील सुशिक्षित बेरोजगार मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. रत्नागिरी मिऱ्या येथील भारती शिपयार्ड लिमिटेड ही कंपनी काही वर्षापूर्वी बंद झाली. त्यामुळे तेथे काम करणारे कामगार बेरोजगार झाले. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. ही कंपनी पूर्वस्थितीत सुरू केल्यास रत्नागिरीतील तरुणांना रोजगार मिळेल. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात पंचतारांकित एमआयडीसी झाल्यास रत्नागिरी मतदार संघ आणि परिसरातील तरुणांना नोकरी व व्यवसायाची संधी उपलब्ध होईल. नवीन उद्योग आणावेत जेणेकरून तरुणांना नोकरीच्या शोधात बाहेर जावे लागणार नाही, या सर्व बाबींचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन देताना भाजपा कामगार आघाडी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष लीलाधर भडकमकर, जिल्हा सरचिटणीस संतोष बोरकर, तालुकाध्यक्ष प्राचीन नागवेकर, तालुका उपाध्यक्ष अमर कीर, उदय गोवळकर उपस्थित होते.
-----------------
rat२९p४.jpg
५३२८९
रत्नागिरीः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरील चर्चासत्रात बोलताना प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी. सोबत अन्य.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र
रत्नागिरीः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र झाले. मुंबई विद्यापीठाचे माजी प्रा. कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी विशेष ऑनलाइन व्याख्यान दिले. प्रमुख अतिथींचा परिचय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी करून दिला. कुलकर्णी यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पार्श्वभूमी, सध्याची शिक्षणपद्धती, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी, त्याची कार्यपद्धती आणि फलित, शिक्षणक्षेत्रात त्यामुळे होणारे आमुलाग्र बदल अशा विविध पैलूंची सविस्तर माहिती दिली. या वेळी र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन सचिव सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. विवेक भिडे यांनी केले. उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी आभार मानले.
---------
आदिती शिवगणला तायक्वांदोत सुवर्ण
रत्नागिरीः फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅंड टेक्नोलॉजीच्या आदिती शिवगण (मेकॅनिकल) हिने कोकण विभाग - ४ मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक पटकावले. तिने हे जेतेपद ५७ किलोपेक्षा कमी वजनी गटामध्ये मिळवले आहे. ही स्पर्धा गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात झाली. आता तिची निवड इंटरझोनल इंटरकॉलिगेट तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे. या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद आणि अॅकॅडमीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
----------
rat२९p३.jpg
53288
रत्नागिरीः अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस देताना प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी. सोबत प्रा. निनाद तेंडुलकर, प्रा. अस्मिता कुलकर्णी, प्रा. वैभव कानिटकर आणि प्रा. सुनील गोसावी.

अभ्यंकर-कुलकर्णी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन

रत्नागिरी ः अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात केले होते. प्राचार्य पी. पी. कुलकर्णी यांनी एनएसएस लोगोमधील आठ आरे व त्यातील रंगांचे महत्त्व विद्यार्थ्यांना स्पष्ट करून त्यांच्या मनामध्ये समाजसेवेबद्दल आपण सदैव तत्पर राहण्याची आज कशी गरज आहे, हे सांगितले. या वेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. कुलकर्णी, प्रा. अस्मिता कुलकर्णी, प्रा. वैभव कानिटकर, प्रा. सुनील गोसावी, प्रा. निनाद तेंडुलकर उपस्थित होते. मीनल यादव या विद्यार्थिनीने एनएसएसमुळे आपण कसे घडलो, हे तिच्या मनोगतातून सांगितले. पर्यवेक्षिका कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना अशाच सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेण्यासाठी उद्युक्त केले. रांगोळी, चित्रकला, एकपात्री अभिनय, वक्तृत्व आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सहकार्यक्रमाधिकारी प्रा. भालचंद्र रानडे, प्रा. मानसी गानू, प्रा. अस्मिता तगारे उपस्थित होते. सूत्रसंचालन मुक्ता शेंबेकर हिने केले. पायल पवार हिने आभार मानले.
----------
rat२९p७.jpg
53292
रत्नागिरीः अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे जेईई, एनईईटी परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी विद्यार्थ्यांसह शिल्पा पटवर्धन, सतीश शेवडे आदी.

स्पर्धा परीक्षेमधील गुणवंतांचा सत्कार
रत्नागिरीः अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे जेईई, एनईईटी परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या दोन्ही परीक्षेमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी आपली यशाची परंपरा कायम राखली. अनुपमा कुलकर्णी हिने एनईईटी परीक्षेत ७२० पैकी ५८६ गुण मिळवून रत्नागिरीमधून प्रथम येण्याचा मान पटकावला. जेईई परीक्षेत पार्थ पाटकर, राज वायंगणकर, यश ओकटे यांनी सुद्धा यश संपादन केले. यश ओकटे याचा सुरत एनआयटीमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन आणि संस्थेचे सचिव सतीश शेवडे यांनी केला.