रत्नागिरी- समाजऋण फेडण्याचे राष्ट्रीय सेवा योजना उत्तम व्यासपीठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- समाजऋण फेडण्याचे राष्ट्रीय सेवा योजना उत्तम व्यासपीठ
रत्नागिरी- समाजऋण फेडण्याचे राष्ट्रीय सेवा योजना उत्तम व्यासपीठ

रत्नागिरी- समाजऋण फेडण्याचे राष्ट्रीय सेवा योजना उत्तम व्यासपीठ

sakal_logo
By

rat29p6.jpg-KOP22L53291 रत्नागिरी ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात डॉ. तुळशीदास रोकडे यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी.

समाजऋण फेडण्याचे एनएसएस उत्तम व्यासपीठ
डॉ. तुळशीदास रोकडे ; ज्ञानप्राप्तीच्या विविध संधीदेखील उपलब्ध
रत्नागिरी, ता. २९ ः महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे ज्ञान, कौशल्यप्राप्ती व समाजपूरक व्यक्तिमत्वाची जडणघडण होणे आवश्यक असते. यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यरत असतो. त्यामुळे समाजऋण फेडण्याचे ते उत्तम व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन गोगटे-जोगळेकर महाविद्यालय समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. निसर्गसंवर्धनाच्या जबाबदारीचे प्रतीक म्हणून रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ. रोकडे यांचा प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. कुलकर्णी यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागातून विद्यार्थांना मिळणाऱ्या विविध विद्यापीठस्तरीय, राज्य व राष्ट्रीय संधी याविषयी माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा महाविद्यालयाचा वारसा मोठा असून या विभागाशी संबंधित अनेक विद्यार्थी आपल्या आयुष्यात यशस्वी असून सामाजिक दायित्वाची जबाबदारी आजही घेत आहेत. सध्याच्या मोबाइलच्या अतिरेकाच्या काळात विद्यार्थांनी स्वचिंतन करणे आवश्यक आहे. आपली अचूक ध्येयनिश्चिती करून विद्यार्थांनी कार्यप्रवण राहावे व राष्ट्रीय सेवा योजना अधिक जाणून घेऊन आदर्श नागरिक, आदर्श विद्यार्थी व आदर्श कुटुंब सदस्य बनावे, असे सांगितले. प्रास्ताविक डॉ. दानिश गनी यांनी केले. सूत्रसंचालन नुपूर लाड हिने केले. या वेळी कार्यक्रमाधिकारी प्रा. उमा जोशी, प्रा. सचिन सनगरे, विद्यार्थी उपस्थित होते.