रत्नागिरी- पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत डीबीजे महाविद्यालयाची बिऱ्हाड प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत डीबीजे महाविद्यालयाची बिऱ्हाड प्रथम
रत्नागिरी- पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत डीबीजे महाविद्यालयाची बिऱ्हाड प्रथम

रत्नागिरी- पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत डीबीजे महाविद्यालयाची बिऱ्हाड प्रथम

sakal_logo
By

rat29p8.jpg ः KOP22L53336
रत्नागिरी ः पुरुषोत्तम करंडक स्वीकारताना चिपळूणचा डीबीजे महाविद्यालयाचा संघ सोबत मान्यवर.
-------
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत
डीबीजेची बिऱ्हाड प्रथम
गोगटेची-कुपान द्वितीय ः अंतिमसाठी चार संघांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ ः मानाची महाराष्ट्रीय कलोपासक पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकीका स्पर्धेत चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयाच्या बिऱ्हाड या एकांकिकेने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात स्पर्धा चुरशीच्या झाल्या. या स्पर्धेत नऊ संघानी सादरीकरण केले. उत्तमप्रकारे सादरीकरण करणाऱ्या येथील चार संघ पुणे येथे होणाऱ्या अंतिम पुरुषोत्तम करंडकसाठी फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा निकाल असा ः डीबीजे महाविद्यालयाची बिऱ्हाड प्रथम, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची कुपान द्वितीय, फिनोलेक्स महाविद्यालयाची समाप्त तृतीय तर देवगड (ता. सिंधुदुर्ग)च्या स. ह. केळकर महाविद्यालयाच्या डू ऑर डाय या एकांकिकेने चतुर्थ क्रमांक पटकावला तर वैयक्तिक सर्वोत्कृष्ट अभिनेता पारितोषिक मत्स्य महाविद्यालयाच्या कुणाल माळी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रांती कांबळे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पारितोषिक बिऱ्हाडसाठी गायत्री शिंदे, सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या शुभम गोविलकर, सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या आर्या वंडकर यांनी पटकावले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी चुरशी झालेल्या या दहा एकांकिकेपैकी डीबीजे महाविद्यालयाची जहाज फुटले आहे ही एकांकिका काही अपरिहार्य कारणासाठी होऊ शकली नाही. नऊ एकांकिकांतून चार विजेते संघ पुण्याला अंतिम फेरीसाठी रवाना होणार आहेत. या मानाच्या पुरुषोत्तम करंडकसाठी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक पारितोषिक कोणालाच प्राप्त झाले नाही. ही सर्व पारितोषिके रत्नागिरी आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रमप्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आली. या वेळी महाराष्ट्रीय कलोपासकचे विश्वस्त प्रदीप पाटसकर, चिटणीस ठाकूरदेसाई तसेच परीक्षक विनयराज उपरकर, प्रदीप तेंडूलकर आणि गिरीश केमकर तसेच डॉ. संजय केतकर, ज्येष्ठ रंगकर्मी लेखक अनिल दांडेकर आदी उपस्थित होते. बक्षीसवितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजा मुळ्ये यांनी केले.