आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी

sakal_logo
By

ratchl292.jpg ः
53420
चिपळूणः दिक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी
मंगेश भोसले ; देशाची प्रगती कौशल्यावर आधारित
चिपळूण, ता. २९ः आयटीआय केलेला विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न असतो. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा. देशाची प्रगती ही तुमच्या कौशल्यावर आधारित आहे, त्यासाठी तुम्ही आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्टीला सामोरे जाणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सह्याद्री तंत्रनिकेतनचे प्राचार्य मंगेश भोसले यांनी सावर्डे येथील कार्यक्रमात केले. ,
सावर्डे येथील आयटीआयमध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या करिअरला चालना मिळण्यासाठी दीक्षांत प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक व माजी विद्यार्थी, रामकृष्ण मोटार कोल्हापूरचे मालक राजीव कोळेकर व प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य मंगेश भोसले उपस्थित होते. आयटीआय सावर्डे येथे प्रथम क्रमांकप्राप्त अनिशा महाडिक, द्वितीय करिश्मा चव्हाण, तृतीय साईराज घाडगे यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयटीआय सावर्डेचे प्राचार्य उमेश लकेश्री यांनी केले. राजीव कोळेकर यांनी आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीत कशाप्रकारे मार्गक्रमण करण्यासाठी धडे दिले. तुमच्या कौशल्याचा फायदा औद्योगिक क्षेत्रात होत असून अनेक तांत्रिक अडचणी तुम्ही कौशल्याच्या जोरावर सोडवू शकता. नवनवीन कौशल्य अवगत कले तर तुम्हाला जीवनात कधीच अपयश येणार नाही, असे सांगितले.
कॉलेज ऑफ डिग्री फार्मसी सावर्डेचे प्राचार्य प्रवीण वाघचौरे म्हणाले, तुम्हाला जे कौशल्य येते त्याचा अभिमान असला पाहिजे. तुम्ही जो कुठला कोर्स केला आहे, त्याचा अभिमान असला पाहिजे. जग कितीही ऑनलाइन झाले तरी जे काही मूलभूत कौशल्य आहेत त्याला पर्याय नसेल. प्राचार्य तानाजी कांबळे म्हणाले, औद्योगिक क्षेत्रामध्ये आयटीआयची सुरवात ही पहिली झाली असे मला वाटते. आयटीआय हे सगळ्या कौशल्याचं फाउंडेशन आहे. प्रत्येकाने आपण केलेल्या कोर्समध्ये स्वतःला अपडेट केले पाहिजे. पालक प्रतिनिधी म्हणून मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिटर ट्रेडचे निदेशक गोरिवले यांनी केले. या वेळी आयटीआय सावर्डेचे सर्व निदेशक, निदेशका, शिक्षकेत्तर कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.