रत्नागिरी ः महावितरणाच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या कक्षाचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः महावितरणाच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या कक्षाचे लोकार्पण
रत्नागिरी ः महावितरणाच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या कक्षाचे लोकार्पण

रत्नागिरी ः महावितरणाच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या कक्षाचे लोकार्पण

sakal_logo
By

ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या कक्षाचे लोकार्पण
रत्नागिरी, ता. 29 ः महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर व रत्नागिरी परिमंडळाच्या ग्राहक तक्रार निवारण मंचच्या नूतन व सुसज्ज सुनावणी कक्षाचे लोकार्पण काल (ता. 28) मुख्य अभियंता परेश भागवत यांच्या हस्ते झाले. वीजग्राहक व महावितरण व्यवस्थापनाच्या संबंधात विश्वासार्हता वाढण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाची भूमिका महत्वाची आहे. रामचंद्र सरदेसाई यांनी सांगितले की, ‘महावितरणमध्ये वीजग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा अस्तित्वात आहे. कोल्हापूर ग्राहक मंचाकडे दाखल तक्रारी जलद गतीने निकाली काढल्या जातात. गेल्या वर्षभरात मंचाने 85 प्रकरणी सुनावणी घेऊन ती निकाली काढली आहेत. कोरोना काळातही मंचाने ऑनलाइन सुनावणी घेऊन 54 प्रकरणे निकाली काढल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.