रत्नागिरी ः ऑफ्रोहचे उपोषण बेमुदत सुरू राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः ऑफ्रोहचे उपोषण बेमुदत सुरू राहणार
रत्नागिरी ः ऑफ्रोहचे उपोषण बेमुदत सुरू राहणार

रत्नागिरी ः ऑफ्रोहचे उपोषण बेमुदत सुरू राहणार

sakal_logo
By

- rat29p29.jpg- KOP22L53416रत्नागिरी ः ऑफ्रोहच्या बेमुदत उपोषणात सहभागी .

ऑफ्रोहचे उपोषण बेमुदत सुरू राहणार

रत्नागिरी, ता. 29 ः ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमनतर्फे (ऑफ्रोह) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 सप्टेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बेमुदत उपोषणाचा चौथा दिवस असूनही शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बेमुदत उपोषणाचे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार जिल्हाध्यक्ष व राज्य प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी व्यक्त केला.
शासन निर्णयातील तरतुदीनुसार सेवासमाप्त कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदाचे आदेश मिळावेत, अनुसूचित जमातीच्या अधिसंख्य निवृत्त कर्मचार्‍यांचे गेल्या 31 महिन्यांपासून थकवलेले निवृत्ती वेतन देण्यात यावे, अधिसंख्य मृत कर्मचार्‍यांच्या वारसांना निवृत्तीवेतन व इतर लाभ देण्यात यावे तसेच कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घ्यावे, अधिसंख्य कर्मचार्‍यांना सेवा सातत्य देऊन वार्षिक वेतनवाढ, भत्ते व इतर सेवाविषयक लाभ मिळावेत या मागण्यांसाठी आफ्रोहने बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. गुरूवारी आंदोलनाचा चौथा दिवस आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बसलेल्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली असून उपोषणकर्त्यांना थकवा जाणवत आहे; मात्र न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे पौनीकर यांनी सांगितले.