चिपळूण ः घरडाच्या 20 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः घरडाच्या 20 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड
चिपळूण ः घरडाच्या 20 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

चिपळूण ः घरडाच्या 20 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

sakal_logo
By

घरडाच्या २० विद्यार्थ्यांची
नामांकित कंपनीत निवड
चिपळूण, ता. २९ ः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांना अभियांत्रिकी शिक्षण मिळावे, या हेतूने लवेल येथे घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले. प्लेसमेंट विभागातर्फे दीडशेहून अधिक कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना संधी मिळते. यावर्षीही विविध विभागातील २० विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली. त्यांना प्रत्येकी वार्षिक साडेतीन लाखाचे पॅकेज मिळाले आहे.
या महाविद्यालयामध्ये केमिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर तसेच या शैक्षणिक वर्षापासून कॉम्प्युटर सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग ही नवीन शाखा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना केवळ अभियांत्रिकी पदवी मिळवून देणे एवढेच उद्दिष्ट्य डोळ्यासमोर न ठेवता त्यांना नोकरीची सुवर्णसंधी मिळावी, यासाठी महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग कार्यरत आहे. महाविद्यालयातील विविध विभागातील २० विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी या नामांकित कंपनीत निवड झाली.
यामध्ये गायत्री पवार, मयुरी भुवड, सुमन सोमवंशी, प्रणय कनावजे, सर्वेश जैतपाल, सानिक कुडाळकर, मंजुळा लहाने, शुभम मोरे, प्रतीक काप, साबिल परकार, कल्पेश लंबाडे, स्वप्नील कारंडे, महेश्वर पणशीकर, शुभम शिंदे, शुभम जाधव, संदेश कुटेकर, रिया वडके, ऋतुजा मोरे, पूजा पोटफोडे, रोहित महाडिक आणि आदिती विचारे यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. पाटील,यांनी अभिनंदन केले.