कामगार कल्याण केंद्राच्या महिला नाट्यस्पर्धेत एटीनफ्लस प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगार कल्याण केंद्राच्या महिला नाट्यस्पर्धेत एटीनफ्लस प्रथम
कामगार कल्याण केंद्राच्या महिला नाट्यस्पर्धेत एटीनफ्लस प्रथम

कामगार कल्याण केंद्राच्या महिला नाट्यस्पर्धेत एटीनफ्लस प्रथम

sakal_logo
By

rat२९p२८.jpg
५३३९७
रत्नागिरीः कामगार कल्याण केंद्राच्या महिला नाट्यस्पर्धेतील विजेता संघ.
------
महिला नाट्यस्पर्धेत एटीनफ्लस प्रथम
रत्नागिरीः महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण आयोजित महिला नाट्यस्पर्धा नुकत्याच सावंतवाडी येथे झाल्या. या स्पर्धेत ज्ञानेश्वर कृष्णा पाटील लिखित "१८+"(एटीन प्लस) प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत ज्ञानेश्वर पाटील लिखित नाटकाचा सांघिक प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये वृषाली पाटील दिग्दर्शन प्रथम, आर्या शेटये अभिनय प्रथम क्रमांक तर या एकांकिकेत अपर्णा आडविलकर, शलाका देसाई ,सानिका देसाई, सिद्धी शिंदे आदी महिलांनी अभिनय केला. या नाटकाला पार्श्वसंगीत शशिकांत गुरव, प्रकाशयोजना धनवंत कासेकर, नेपथ्य नंदू भारती, सत्यविजय शिवलकर, रंगभूषा-वेशभुषा प्रकाश ठीक यांनी केली. या एकांकिकेची निर्मिती संस्कृती शिंदे रत्नागिरी केंद्र महिला कल्याण सहाय्यिका यांनी केली असून संकल्प कलामंच रत्नागिरीकडून विशेष साहाय्य लाभले.
------
कालेश्वरीच्या नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रम
रत्नागिरीः संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावातील श्री देवी कालेश्वरीच्या नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रविवारी (ता. २) दुपारी साडेतीन वाजता नवचंडिका होम, रात्री १० वाजता सोनार सुतार मंडळाचे भजन, सोमवारी (ता. ३) नवचंडिका होमहवन, दुपारी दीड वाजता सत्यनारायणाची महापूजा, साडेनऊ वाजता संयुक्त भजन, रात्री साडेदहा वाजता शक्तीवाले शाहीर संजय जोशी, सोमेश्वर विरुद्ध तुरेवाले शाही राजेश गुरव-खानू यांचा जाखडीचा सामना होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थितीत राहावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.