-रत्नागिरी ः संक्षिप्त ः क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-रत्नागिरी ः संक्षिप्त ः क्राईम पट्टा
-रत्नागिरी ः संक्षिप्त ः क्राईम पट्टा

-रत्नागिरी ः संक्षिप्त ः क्राईम पट्टा

sakal_logo
By

त्या तीन संशयितांना जामीन
रत्नागिरी ः शहरातील आठवडा बाजार येथील यश ट्रेडर्स दुकान फोडून रोख ३२ हजार रुपये लांबवणाऱ्या तीन संशयितांना बुधवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. फिरोज इसरार आलम (४८, रा. उत्तरप्रदेश), मोहम्मद सुफियान मोहम्मद अब्बास (२७, रा. कानपूर उत्तरप्रदेश), मोहम्मद अझरुद्दीन मेहम्मद हनीफ (२२, रा. कासिमनगर, उत्तरप्रदेश) अशी जामिन मंजूर केलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. संशयितांनी निर्मल रमेश ओसवाल (३३, रा. आठवडा बाजार, रत्नागिरी) यांच्या आठवडा बाजार येथील यश ट्रेडर्स नावाचे दुकान फोडून गल्ल्यातील रोख ३२ हजार रुपये चोरून नेले होते. शहर पोलिसांच्या पथकाने गोवा येथील कळंगुटमधून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्याकडून चोरीला गेलेली रोख रक्कमही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते.

३५ लिटर डिझेल परस्पर विकले, दोघांवर गुन्हा
खेड ः तालुक्यातील बोरज येथील कल्याण टोलवेज कंपनीतील कामगारांनी ३५ लिटर डिझेल परस्पर विकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. अर्जुन लखनसिंग पाटीदार, संदीप कृष्णा घाटगे (४०, भरणेनाका, खेड ) अशी गुन्हा दाखल केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन लखनसिंग पाटीदार हा छाबड़ा मरीन या कंपनीत जनरेटरच्या देखरेखीसाठी कामाला होता. कंपनीने जनरेटरसाठी आणलेले ३५ लिटर डिझेल पाटीदार याने कॅन भरून टेम्पो ट्रॅव्हल्स चालक संदीप घाटगे याला दिले. या डिझेलची किंमत ३ हजार ३९५ रुपये आहे. ही घटना सोमवारी (ता. २६) घडली. या प्रकरणी कंपनीचे रोनित अनिल ईनरकर (२९, खेड) यांनी खेड पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अर्जुन आणि संदीप यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.