कदंबा-एसटीची समोरासमोर धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कदंबा-एसटीची समोरासमोर धडक
कदंबा-एसटीची समोरासमोर धडक

कदंबा-एसटीची समोरासमोर धडक

sakal_logo
By

swt2923.jpg
53437
इन्सुलीः येथे कदंबा व एसटीमध्ये अपघातानंतर बघ्यांची झालेली गर्दी. (छायाचित्रः नीलेश मोरजकर)


कदंबा - एसटीची समोरासमोर धडक
इन्सुलीतील घटनाः प्रवाशी सुखरुप
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २९ः गोवा परिवहन मंडळाची कदंबा आणि एसटी यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. ही घटना आज सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बांदा - सावंतवाडी मार्गावर इन्सुली - कालवा परिसरात घडली. कदंबाचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
अपघातानंतर दोन्ही गाड्या रस्त्याच्या मधोमध अडकल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. अपघाताची माहिती देऊनही एसटी प्रशासनाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी न पोचल्यामुळे वाहनधारकांसह ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. अपघातग्रस्त कदंबा सावंतवाडी येथून पणजीच्या दिशेने जात होती. तर एसटी बस गोवा येथून देवगडला जाण्यासाठी निघाली होती. यावेळी इन्सुली येथे हा अपघात घडला. सुदैवाने दोन्ही बसमधील प्रवासी सुखरूप होते; मात्र अपघातानंतर दोन्ही गाड्या रस्त्याच्या मधोमध अडकल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. सायंकाळी उशिरा अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.